आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गदारोळ:चौकशीच्या ठरावावरून अधिकाऱ्यांचाच सभात्याग; सत्ताधारी-विरोधकांत घमासान

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन तास अध्यक्षांसह सत्ताधारी राहिले बसून, नंतर पुन्हा सुरू झालेली सभा 10 मिनिटात आटोपली

सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने विशेष सभेत मांडलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीच्या ठरावावरून सर्वच अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या बुधवारी सभात्याग केला. या ठरावाला विरोध करीत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याने सभागृहात वाद झाला. सभेत असा प्रशासकीय ठराव मंजूर करत येत नसल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी व सचवि असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोंदवले. सर्व अधिकारी सभागृहातून बाहेर पडल्यानंतर दोन तास सभागृहात अध्यक्ष व सत्ताधारी सदस्य बसून होते. ५.५० वाजता सचवि व दोन कर्मचारी सभागृहात आले आिण १० मिनिटात सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

अकोला पं.स.चे बिडीओ राहुल शेळके , पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांच्याविरोधात गैरवर्तणुकीप्रकरणी विभागीय चौकशीचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून मांडला. त्याला शविसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष सदस्यांनी या ठरावाला विरोध केला. यात शविसेनेचे गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, संजय अढाऊ, गोपाल भटकर, गणेश बोबडे, काँग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर, सभापती सम्राट डोंगरदविे व अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांचा समावेश होता. भाजपचे रायसिंग राठोड यांनीही विरोधकांना साथ देत बिडीओंनी कधीही गैरवर्तुणूक केल्याचे मी पाहिले नाही, असे सांगितले.

सत्ताधारी सदस्य शंकरराव इंगळे यांनी पदाधिकाऱ्यांना बिडीओंनी अपमानास्पद वागणूक देणे योग्य नसल्याचे म्हणत प्रशासनाने कार्यवाही केली असती तर ठराव घेण्याची वेळ आलीच नसती, असेही ते म्हणाले. अखेर गदारोळातच ठरावाचे सूचक अनुमोदकांची नावे अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी जाहीर केली. दरम्यान अकोला बिडीओ राहुल शेळकेंवर सत्ताधाऱ्यांकडून असभ्य वागणुकीचा आरोप करण्यात येत असला तरी याला वेगळीच किनार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका सदस्येचा पती हा पं.स.मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्याला प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले. मात्र आता या कर्मचाऱ्याची सोयीच्या ठिकाणी पदस्थापना करण्यात यावी, यासाठी पं.सं. प्रशासनावर दबाव टाकण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...