आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्यारचा शेवट‎ खूनासारखा वाईट:मुलींनाे, पालकांनाच कन्यादानाची‎ संधी देण्याचा संकल्प करा, पंडित‎ प्रदीप मिश्रांचे आवाहन

अकाेला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मुलगी हीच अाई-वडिलांचे जीवन असून, ‎ ‎ मुलींनाे त्यांच्या मर्जीनेच लग्न करू अाणि ‎ ‎ अापल्याच पालकांना कन्यादान करण्याची‎ संधी देऊ, असा संकल्प करा,’ असे अावाहन ‎ ‎ शिवमहापुराण महाकथेत मंगळवारी पंडित‎ प्रदीप िमश्रा यांनी केले.

अविवाहित मुलींना ‎ ‎ कथामंडपात उभे राहण्यास सांगून त्यांनी तसा ‎ ‎ संकल्पही करून घेतला.‎ अाई-वडिल मुलींना उच्च शिक्षण, सर्व‎ सुविधा देतात. मात्र मुली शरीययष्टी, वाहने, ‎ ‎ भाैतिक सुख देणाऱ्या साहित्याकडे पाहून‎ भाळून पळून जातात; परंतु त्यानंतर त्यांना ‎पश्चात्ताप, दु: ख हाेते. मुली भरकटत‎ असल्याने ‘द केरला स्टाेरी’सारख्या‎ चित्रपटांची िनर्मिती करावी लागते.

प्रेम हे ‎ ‎ समर्पणाचे प्रतीक असून, प्यारचा शेवट‎ खूनासारखा वाईट होतो, असेही ते म्हणाले.‎ आचार, विचार, सत्कार व प्रेमाने जीवन श्रेष्ठ‎ हाेते.‎ सुदृृढ असतानाच कथा श्रवणासह साधना‎ करा, असे म्हणत त्यांंनी अाराधनेचे महत्त्व‎ िवषद केले. पाचवे पुष्प गुंफताना पं. प्रदीप मिश्रा‎ यांनी चंचल डोळे व मनावर नियंत्रण ठेवावे,‎ कर्म प्राधान्य, शुद्ध आणि सात्त्विक भावनेने‎ कथा, सत्संग केल्यास देव, संत चरणांची‎ मिळणारी रज, पैशाच्या लोभापायी तुटत‎ चाललेली रक्ताची नाती, कौटुंबिक दुरावा,‎ धर्म, देवालये, सत्संगांचा धंदा अशा‎ वास्तवावर प्रहार केले.

चित्रपटांच्या‎ काल्पनिक कथांमुळे भरकटत चाललेल्या‎ मुलींची समजूत काढत त्यांनी कुटुंब, प्रेम,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ वात्सल्यपूर्ण भक्तीचे महत्त्व पटवून दिले.‎ आदरातीथ्य कसे करावे, गरिबांकडून‎ शिकावे. श्रीमंतांच्या विवाह, समारंभात‎ तुम्हाला कोणी विचारत नाही. धन, संपत्ती,‎ वैभवाने सत्कार, आदर मिळत नसून,‎ त्यासाठी वाणीत गोडवा, वर्तनात नम्रता,‎ समर्पित भावनेने प्रेम अशा गुणसंचयावर‎ जीवन श्रेष्ठ बनते.‎

लालूच, तृष्णा, ईर्ष्या, क्रोध, आकस ठेवून‎ सत्संग केल्यास दु:ख मिळेल, असे सांगून‎ शरीर धुण्याने भगवंत मिळाला असता तर‎ पाण्यातील मासाेळीला सर्वप्रथम देवाची प्राप्ती‎ झाली असती. देव शरीर नव्हे, तर मन शुद्ध‎ असलेल्या साधकाला मिळताे. विचार आणि‎ दृष्टी यावरच जशास तसे व्यक्ती भेटतात.‎ चेहरे, कपडे बदलण्यापेक्षा स्वतःचा व्यवहार,‎ वर्तन बदला. लोकजवळ येतील असा सल्ला‎ त्यांनी दिला.‎

परिश्रमानेच भाग्य बदलणार

श्रवण‎ शक्ती प्रबळ बनवून मन, बुद्धी, हृदय एकाग्र‎ ठेवून कथा ऐकताना ज्याचा अंगावर रोमांच ,‎ हास्य, डोळ्यात भावाश्रू दाटतात तो खरा संत‎ होतो. काही जण देवाजवळ असूनही देवाचे‎ होत नाहीत.‎ भगवंतावरील विश्वास ढळू देऊ नका.‎ िवश्वास श्रद्धेत परिर्वतीत करा. जल, वायू सह‎ सर्व स्तरात शिव असल्याचे पं. प्रदीप मिश्रा‎ यांनी स्पष्ट केले. परिश्रमाचे महत्त्व पटवून‎ देताना भाग्य बदलण्यास दुसरे कोणी येणार‎ नसून, घरात बसूनही ते बदलणार नाही.‎ सातत्याने केलेल्या परिश्रमामतूनच परिवर्तन‎ होईल, असे त्यांनी सांगितले.‎

देवालये नाहीत उत्पन्नाची साधने‎

दुसऱ्याने शिवी दिली तर प्रतिक्रिया न देता मौन‎ धारण करून जप करा. तुमच्या‎ अंत:रमनातील देव आपोआप उत्तर देईल.‎ विंचू, सापापेक्षाही मनुष्य विषारी झाला अाहे.‎ मनुष्य चावल्यास काेणता उपचार कराल,‎ असा प्रश्न त्यांनी केला. कुटुंबातील सदस्यांत‎ समर्पित भावनेने प्रेम असावे. धर्म, कथा,‎ देवालये, सत्संग हे उत्पन्नाचे साधन‎ नसल्याचेही पंडित मिश्रा यांनी स्पष्ट केले.‎ मुलगी करते दाेन कुटुंबांचा उद्धार‎ मुलीमुळे दाेन कुटुंबांचा उद्धार हाेताे. मुलगी‎ पालकांचा गौरव, अभिमान असून, मुलीचे‎ पिता हे भाग्यच नाही सौभाग्यशाली असतात.‎ मुलीच्या पित्यालाच निवडणुकीत उमेदवारी‎ तर मुली असलेल्या घरातच मुलींना द्या,असे‎ आवाहन पं. प्रदीप मिश्रा यांनी केले.‎

अन् डाेळ्यात अाले भावाश्रू‎

कथेत पं. प्रदीप मिश्रा यांनी बाप-लेकीचे‎ नाते कसे हळवे असते, लेकच बापाचे‎ जीवन असते, हेही सांगितले. लेकीच्या‎ लग्नातील भावूक क्षणाच्या वर्णानामुळे‎ मुलींसह कथा मंडपातील अनेकांना‎ गहिवरून अाले अाणि त्यांच्या डाेळ्यांच्या‎ कडा भावाश्रुंमुळे अाेल्या झाल्या.‎