आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वसन विकाराशी संबंधित तक्रारी:थंडीमुळे ज्येष्ठांमध्ये श्वसनाच्या तक्रारी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस थंडी वाढत असल्याने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसन विकाराशी संबंधित तक्रारी दिसून येत आहेत. खासकरून दमा असणाऱ्या रुग्णांना थंडी, धुक्यामुळे त्रास होत आहे.वातावरणात सतत बदल, रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी, दुपारी पुन्हा उन्हाचे चटके आणि उकाडा असे काहीसे वातावरण आहे. वाढलेल्या थंडीमुळे वात, हातापायाचे दुखणे, दमा, त्वचारोग, संसर्गजन्य आजार तसेच श्वसन विकाराशी संबंधित तक्रारी समोर येत आहेत.

यावर खासगी रुग्णालयातून रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान ऋतूबदल होत असताना सामान्य स्वरूपाच्या तक्रारी समोर येतात. प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना लवकर संसर्गजन्य आजारांची लागण होते. त्यामुळे व्हायरल फिवर किंवा इतर तापींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सियसवर राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...