आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन भीमनगर अकोला यांच्या वतीने कर्ता हनुमान मंदिर वानखडेनगर येथील समाज भवन येथे नुकतेच सात दिवसीय बेकरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. इमारत बांधकाम कामगार व त्याचे कुटुंबिय यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुभाष म्हैसने यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका रंजना विंचनकर, बेकरी प्रशिक्षण मुख्य प्रशिक्षीका प्रांजली देशमुख, निरिक्षक बि. टी. भेले तर विशेष पाहुण्या म्हणून वैशाली नवघरे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त यांची उपस्थिती होती. उदघाटन व समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत वैशाली नवघरे यांनी केले. बेकरी प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी महिला शिबीरार्थींना मोमोज, मंचुरीयन, पनीर चिली, पनीर बेसिक, पिजाबेस, रोल, ढोकळा, इडली, डोसा, पिझ्झा, सोयाचाप, पुदीना चटणी आदी पदार्थांचे प्रात्यक्षिकादारे प्रशिक्षण दिले.
समारोप प्रसंगी सहभागी शिबिरार्थिंना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार केंद्र संचालक अजय पोरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी केंद्र महिला कल्याण सहाय्यक मंगला महल्ले, किरण भोगे, नितीन मुळे, सविता पवार, आशा कोल्हे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.