आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रचनात्मक उपक्रम:इनरव्हील क्लब क्विन्सच्या चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद ; विद्यार्थ्यांनी आपली कला दाखवली

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रचनात्मक सेवेत सक्रिय इनरव्हील क्लब ऑफ अकोला क्विन्सच्या वतीने स्लम विभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व शालेय साहित्य वितरण उपक्रम घेण्यात आला. क्लबचे अध्यक्ष अॅड. तेजल मेहता यांच्या अध्यक्षतेत या अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला दाखवली.

या स्पर्धेत तब्बल तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात सहा विद्यार्थ्यांना पुस्तके व पेनच्या रुपात पारितोषिके देण्यात आलीत. या दिनी क्लबच्या वतीने आर्थिक कमकुवत असणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी क्लबच्या वतीने मोठ्या उमरीतील काली माता मंदिर परिसरात सायकालीन शाळा प्रारंभ करण्यात आली. या सेवा उपक्रमांत संदीप गावंडे, शिवलाल इंगळे, रवी नालट यांचे सहकार्य लाभले. त्यांचा क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला.या उपक्रमात अध्यक्ष अॅड तेजल मेहता, सचिव एकता अग्रवाल, कार्यकारी सदस्या तसणीम वाघ, प्रांजली जयस्वाल व शिक्षिका गायत्री व गौरी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...