आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या (प्राथमिक) कक्षात ठिय्या आंदाेलन केल्यानंतर तीन शिक्षकांच्या नियुक्तीचा आदेश शिक्षण विभागाने जारी केला.
मात्र यातील एक शिक्षक हा मार्च 2021 मध्येच सेवानविृत्त झाल्याने जिल्हा परिषद सदस्या प्रमोदनिी कोल्हे व वंचित बहुजन आघाडीचे नेते न प्रमोद कोल्हे यांनी आक्रमक पवित्र घेत मंगळवारी सकाळी थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात धाव घेतली. या ठिकाणी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बेशरमचे झाड ठेवून आपला संताप व्यक्त केला.
शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काेट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भाैतिक सुविधा, पाेषण आहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येते. मात्र तरीही जि.प.चा शैक्षणिक दर्जा कॉन्व्हेंटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. याला शिक्षकांना शिक्षणबाह्य कामे देणे, रिक्तपदांसह अन्य बाबीही जबाबदार आहेत. दरम्यान अडगाव बु. येथे शिक्षक नसल्याने 19 डिसेंबर राेजी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात आंदाेलन केले हाेते.
अशी हाेती रिक्त जागांची स्थिती
अडगाव बु. येथील जि.प.शाळेत इयत्ता 9 वी व 10 साठी वजि्ञान विषय शिकवण्यासाठी अनेक वर्षांपासून शिक्षकच नाहीत. गणित विषय शिकवणारे शिक्षक 2020 मध्ये सेवानविृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. इयत्ता 9 वी व 10 वीसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. गत दाेन वर्षांपासून इयत्ता 11 वी व 12 वी साठी एकच शिक्षक कार्यरत आहे. या वर्गासाठी मराठी व इतिहास विषय शविकण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाही.
काय आहे आदेशात?
तीन शिक्षकांची शिक्षकांची तात्पुरती शैक्षणिक व्यवस्थात करण्यात येत असल्याचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केला. या तिघांची माध्यमिक शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे. यात जि.प. आगरकर येथील वर्षा तुकाराम तायडे, सुरेशा बंड आणि पार्थडी येथील रवींद्र शंकर नाथे यांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सेवानविृत्त शिक्षकाची शाळेवर नियुक्ती केल्याने वंचितच्या सदस्या प्रमोदिनी कोल्हे व गोपाल कोल्हे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली ठग यांच्याशी चर्चा केली. शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी मद्यप्राशन करून काम करतात काय, असा सवाल करीत संबंधितांवर कार्यवाहीची मागणी कोल्हे यांनी केली.
शिक्षण विभाग लोकप्रतिनिधी यांची फसवणूक
दिशा भूल करू शकतात, तर सामान्य नागरिकांशी कसे वागत असतील अशा शब्दांत गोपाल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.