आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामासाठी पैशाची मागणी केल्यास जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकाने तक्रार करावी, असे आवाहन पेन्शनर टीचर्स फोरमने केले आहे. जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटित नसल्याने त्याला वैयक्तिक सेवाविषयक कामांसाठी वारंवार खिंडीत पकडले जाते. आयुष्यभर शाळांमधून देशाची भावी िपढी घडवणाऱ्या सेवा निवृत्त शिक्षकाला जिल्हा परिषदेमध्ये आपल्या हक्काच्या कामांसाठी वणवण भटकावे लागते, अशी खंत पेन्शनर टीचर्स फोरमने व्यक्त केली आहे.
निवृत्त शिक्षकास साधी सन्मानाची वागणूकही दिली जात नाही. थकूनभागून दुसऱ्या मजल्यावर शिक्षण विभागात आल्यानंतर त्याला क्षणभर बसण्यासाची वेगळी सुविधा नाही. पेन्शनकेस लांबवून सदर शिक्षकाची उपासमार, दमछाक केली जाते, असा आराेप फाेरमने केला आहे.
काही कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा परिषदेला बदनामीचा कलंक लागला आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या कोणत्याही अडीअडचणी समस्या इत्यादी असल्यास शिक्षकांनी पेन्शनर्स टीचर्स फोरमकडे लेखी स्वरुपात स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन फोरमतर्फे करण्यात आल्याचे जयंत घाटोळ, ज्ञानदेव शेगोकार, अरुण वाघमारे, रामदास मालोकार, राजेंद्र थारकर, सतीश दोडके, शामराव गोतमारे, रघुनाथ म्हैसने, रमेश काळे, नसीरोद्दीन जहागीरदार, कल्पना बिडवे, हेमंत कुळकर्णी, संतोष महल्ले, श्रीकर लाहे, प्र.भा.दोड, रमेश नालिंदे, संजय महल्ले आदी सेवानिवृत्त शिक्षकांनी कळवले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.