आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित जुन्या पेन्शन लागू करण्याचा आग्रह‎:नागरी सेवांकडे पाठ; सरकारी‎ कर्मचारी आजपासून संपावर‎

अकाेला‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत अनेक वर्षांपासून प्रलंबित‎ असलेली जुनी पेन्शन योजनेसह अन्य‎ मागण्यांसाठी मंगळवार १४ मार्चपासून‎ सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांकडून‎ संप पुकारण्यात येणार असल्याची‎ माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती‎ संघटनेचे निमंत्रक, अध्यक्ष राजेंद्र‎ नेरकर, िज.प. कर्मचारी युनियनचे राज्य‎ सरचिटणीस सुनील जानाेरकर यांनी‎ साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.‎ जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी‎ संघटना सहभागी होत असून, मागण्या‎ मान्य होईपर्यंत संप मागे घेण्यात येणार‎ नाही. संपामुळे शिक्षणासह आराेग्य‎ सेवाही प्रभावित हाेणार आहे.

सरकारी,‎ निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर,‎ महापालिका, नगरपालिका, नगर‎ परिषदा, नगर पंचायती कर्मचारी व‎ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या‎ प्रलंबित आहेत. याबाबत मध्यवर्ती‎ संघटना व इतर संघटनांतर्फे शासनाशी‎ चर्चा करण्यात आली. त्यांना निवेदने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सादर करण्यात आली. मात्र मागण्यांना‎ आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच‎ लावण्यात आल्याचा आराेप संघटनांनी‎ केला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी‎ बेमुदत संपावर जात असल्याची‎ माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.‎ या वेळी नियंत्रण समन्वय समितीचे‎ अध्यक्ष राजेंद्र नेरकर, जि.प. कर्मचारी‎ महासंघाचे सुनील जानोरकर, महसूल‎ कर्मचारी संघटनेचे वैजनाथ कोरकणे,‎ शिक्षक समितीचे राजेश देशमुख,‎ माराेती वराेकार, संतोष कुटे, मंगेश‎ पेशवे, उपस्थित होते.

गुंतवणुकीवर टीका‎
जुनी पेंशन आमच्या हक्काची असून,‎ सरकार दरमाह आमच्या वेतनातून‎ कपात केलेली रक्कम शेअर बाजारात‎ गुंतवत आहे. काही िदवसांपूर्वीच‎ अदानी समुहामध्ये सरकारी यंत्रणेने‎ गुंतवलेल्या पैशांचे काय झाले हे‎ सर्वश्रृत आहे. हा जुगारच नाही काय,‎ असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...