आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मिटकरींवरील कमिशनच्या आरोपाची चौकशी करू:महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्तांनी कमिशनबाजीचा आरोप केला आहे. त्या आरोपावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमदार कामे देताना कमिशन घेतात हे आरोप गंभीर आहेत. या आरोपांची चौकशी राज्य सरकार करेल. ते अकोल्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गुरूवारी अकोला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याच पक्षाचे नेत्यांकडून बेताल वक्तव्य केल्या जात होते. आजही तसेच सुरु आहे. आमदार मिटकरी यांच्यावर कमिशनचा आरोप करण्यात आला. ही गंभीर बाब आहे. यामुळे त्यांच्याच पक्षाची प्रतिमा खराब होत आहे. त्यांच्या पक्षनेतृत्वाने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्यावर जे आरोप आहेत त्या आरोपांची सरकार चौकशी करेल. त्यांच्या पक्षाने सध्याच्या आरोपांसंदर्भात गांभिर्याने विचार करावा असेही विखे पाटील म्हणाले.

राज्यात मंत्र्याची संख्या कमी असल्याच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचे म्हटले. मंत्री कमी असल्याने कामे थांबली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मिटकरींनी अब्रु नुकसानीची नोटीस

आमदार मिटकरी यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर कमिशनचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप बिनबुडाचे आहेत असे सांगत आमदार मिटकरी यांनी त्यांंच्यावर आरोप करणारे शिवा मोहोड आणि अन्य दोघांना पाच कोटी रूपयांची अब्रु नुकसान नोटीस पाठवली आहे. तर मोहोड यांनीही प्रत्युत्तर म्हणून मिटकरींना एक रूपया अब्रु नुकसान नोटीस दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...