आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील 20 वर्षात शहरात नेमक्या कोणत्या सोयी सुविधा हव्यात, कोणत्या-कोणत्या बाबींची गरज आहे, या बाबी सर्व सामान्य नागरिकांकडून मांडण्यासाठी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 2 जानेवारी रोजी महापालिकेच्या मुळ तसेच हद्दवाढ भागाच्या एकत्रित विकास योजनेची सभा घेण्यात आली. या सभेत नागरिकांनी सोयी सुविधा तसेच समस्या मांडल्या तर पुढाऱ्यांनी सभेत विविध प्रश्न उपस्थित केले.
शहराची विकास योजना तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने अकोला महापालिका आणि नगर रचना विकास योजना विशेष घटक पवईचे उपसंचालक यांच्या विद्यमाने पुढील 20 वर्षाच्या कालावधीत शहरात नेमक्या कोणत्या सोयी सुविधा अपेक्षित आहे? नागरिकांना नेमके काय हवे आहे? याबाबी जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. यापूर्वी 5 ऑगस्ट 2022 रोजी अशीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी सोयी सुविधा ऐवजी समस्यांचा पाढा वाचला होता. मात्र या बैठकीत काही नागरिकांनी सोयी सुविधा सुचवल्या. बैठकीला नगर रचना विकास योजना विशेष घटक पवईचे विवेक मोरे, महादेव कुबल, प्रमोद दांदळे, हरीश खंडारे आदी उपस्थित होते.
या सुविधांची केली मागणी
विविध ठिकाणी पार्कींग, हॉकर्स झोन, शहर बस वाहतुकीसाठी स्थानक तसेच थांबे, हद्दवाढ भागात खेळण्यासाठी मैदाने, योग केंद्रासाठी आरक्षण, अभ्यासिका, स्टेडीयम आदी सुविधांची मागणी नागरिकांनी केली. तसेच सभेत अनेक नागरिकांनी डिपी मध्ये रस्त्याची रुंदी जेवढी दर्शवली आहे. तेव्हढीच ठेवावी तर काहींनी तुर्तास जेव्हढी रुंदी आहे, तेव्हढीच ठेवण्याची मागणी केली.
विविध प्रश्न केले उपस्थित
या सभेत विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती. यापैकी काही पुढाऱ्यांनी सोयी सुविधा सुचविल्या तर काहींनी उपस्थित अधिकाऱ्यांना थेट प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी ज्यावेळी स्पष्ट केले की आम्हाला सोयी सुविधा सुचवा त्यावेळी आमचे म्हणणे, तुमच्या मार्फत शासनापर्यंत पोचविण्याची विनंती पुढाऱ्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.