आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्णा नदीच्या तीरावरील तालुक्यातील तीर्थक्षेत्र लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान येथे कावड यात्रा साजरी केली जाते. परंतु, कावडधारी भाविकांना अडचणी व समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांचा प्रशासनातर्फे आढावा घेण्यात आला. येथील नदीजवळ पुरामुळे रस्त्यावर पडलेली खड्डे बुजवावे, लक्षेश्वर मंदिर ते पूर्णा नदीपर्यंत पथदिव्यांची व्यवस्था व्हावी, सर्च लाईटची व्यवस्था करावी, पूर्णा नदी पात्रात बोअर करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रविवारी रात्री कावडधारी भावीक लाखपूरी येथे येतात. त्याकरता सायंकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत दर्यापूर मूर्तजिापूर मार्गावरील वाहतुकी संदर्भात नियम करावे. या मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलनाचे आयोजन केले होते. परंतु, याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन समस्या मार्गी लावण्यासाठी लाखपुरी येथे भेट देण्याचे ठरविल्यानंतर हे आंदोलन स्थगित केले होते. त्यानुसार मंगळवारी यासंदर्भात पाहणी केली.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्री लक्षेश्वर संस्थान लाखपूरी येथे कावड यात्रा महोत्सव २१ ऑगस्टला रविवार संध्याकाळी होणार आहे. त्याकरता मंगळवारी आ. पिंपळे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत, ग्रामिणचे ठाणेदार गोविंद पांडव, महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता मनोज खाडरे, कनिष्ठ अभियंता आनंद भोई, सहायक अभियंता पंकज जोगी, अभियंता मंगेश काळे, जि. प. बांधकाम उपविभागाचे अभियंता उमाळे, अभियंता झटाले, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता एम. ए. ढोंगे, ग्रामविकास अधिकारी जाधव, सरपंच अजय तायडे, उपसरपंच राजू कैथवास, मंडळ अधिकारी रामराव जाधव, तलाठी बोळे यांनी कावड यात्रेच्या व्यवस्थेची पाहणी केली.
कावड यात्रेदरम्यान येणाऱ्या समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या. यावेळी कावड उत्सव समितीतर्फे सचिन देशमुख, लक्षेश्वर संस्थान तर्फे त्रिलोक महाराज, ठाकूरदास अरोरा, संस्थान अध्यक्ष राजु दहापुते, अॅड. चंद्रजीत देशमुख, कमलाकर गावंडे, दर्यापूर येथील कावड मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख व पदाधिकारी, अॅड. कपिल कांबे, किशोर ठाकूर, इब्राहीम घाणीवाले, संजय गुप्ता, पप्पू तिडके, नजाकत पटेल, विलास नसले, जयप्रकाश रावत, संतोष माने, अतुल नवघरे, गजानन गवई तसेच दर्यापूर येथील गजानन देशमुख, आपत्कालीन पथकाचे सुरज कैथवास, ओम बनभेरु, राकेश पूरोहित, सचिन तामसे लक्षेश्वर संस्थेचे सेवाधारी नाना मेहर, नितीन सुरजुसे, श्रीकांत देशमुख आदींची उपस्थीती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.