आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रपुरस्कृत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अंतर्गत विविध विभागाद्वारे केलेल्या कामांचा आढावा केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरणही केले.जलशक्ती अभियानः कॅच दि रेन, या अभियानाचा आढावा व पाहणीसाठी जिल्ह्यात केंद्रीय पथक आले. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय विभाग नवी दिल्लीचे संचालक प्रशांत अग्रवाल व केंद्रीय जल, उर्जा व संशोधन संस्था पूणेचे वैज्ञानिक भुषण तायडे, या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध विभागाद्वारेे जलशक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) वैशाली ठग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व अन्य विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी आदी उपस्थित होते. जलशक्ती अभियानातंर्गत विविध विभागाव्दारे केलेल्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली. अशी िदली मािहती ः जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात जलशक्ती अभियानातंर्गत झालेल्या कामाचे सादरीकरण केले. तसेच नव्याने होत असलेल्या कामांची माहिती दिली. लोकसहभागातून नदी, नाले व तलावातील गाळ काढण्यात आलेल्या कामाची माहिती व सादरीकरण करण्यात आले. जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. याठिकाणी केली पाहणी केंद्रीय पथकाने शिवापूर, घुसर, अनकवाडी व आपोती बु. येथील नदी व नाल्याचे खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी कृषी विद्यापीठाविषयी व जलसंधारण संदर्भांत केलेल्या कामाची माहिती केंद्रीय पथकास दिली. कृषी विद्यापीठ अंतर्गत बाबुळगाव येथील तलावाची पाहणी केली. अकोला येथे केंद्रपुरस्कृत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अंतर्गत विविध विभागाद्वारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा केंद्रीय पथकाने घेत कामांची पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.