आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा पाणीटंचाई निवारणासाठी तयार केलेल्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कात्री लागल्यानंतर जिल्हा परिषदेने आता पंचायत समितीकडून सुधारित प्रस्ताव मागवण्यास सुरुवात केली आहे. १५ मार्चपर्यंत हे प्रस्ताव सादर करण्याची सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत जि. प. पदाधिकारी व सर्वपक्षीय सदस्यांकडून सविस्तर आराखड्यासाठी हाेत असलेल्या प्रयत्नांवर पाणी तर फेरले जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त हाेत आहे.
जिल्हा परिषदेने १५ काेटींच्या आराखड्यात ११३९ उपाययोजना प्रस्तावित केल्या हाेता. दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात नागरिकांना पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. अनेक किमी. पायपीट करून पाणी आणावे लागते. खारपाणपट्यात तर पाण्यासाठी संघर्षच करावा लागताे. काही ठिकाणी तर पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून ग्रामस्थांना दिलासा िमळावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात येताे. त्यानुसार सन २०२३ वर्षाच्या टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र हा आराखडा आता सुधारित करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याला लागणार कात्री : १) पाणी टंचाई निवारण कृती आराखड्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली हाेती. जलजीवन मिशन अंतर्गत काही गावांतील कामेही मार्च महिन्यात पूर्ण हाेणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना प्रस्तावित हाेण्याची शक्यता कमीच आहे. २) गत तीन वर्षात उपाययोजना केलेल्या ठिकाणांचाही उल्लेख नसण्याची शक्यता आहे.
भूजल पातळी डाऊन नसून, सध्या अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई नसल्याचेही बैठकीत सांगण्यात आले हाेते. त्यामुळे अशा ठिकाणी टँकर सुरू हाेण्याची शक्यता धूसर आहे. अर्थात सुधारित अहवाल तयार झाल्यानंतर सर्वच बाबी स्पष्ट होणार आहे. तीन महिन्यांसाठी हाेणार आराखडा : ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजनेच्या कामाची व्याप्ती वाढतच आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित आहेत. परिणामी मार्चपर्यंत आराखडा निरंक करून एप्रिल ते जूनपर्यंतचा आराखडा सुधारित करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले हाेते. त्यामुळे १५ मार्चपर्यंत सुधारित आराखडा तयार करून मार्च अखेरीस सादर हाेण्याची शक्यता आहे.
असा हाेता आक्षेप
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ३२१ गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे आराखड्यात नमूद केले होते. टंचाई निवारणासाठी ७३७ उपाययोजना निश्चित केल्या होत्या व त्यासाठी ९ कोटी ९२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख प्रस्तावित आराखड्यात केला होता. मात्र आराखड्यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्याने नव्याने आराखडा तयार करण्यात आला.
काेणता आराखडा हाेणार अंतिम
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ३२१ गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे आराखड्यात नमूद केले होते. टंचाई निवारणासाठी ७३७ उपाययोजना निश्चित केल्या होत्या व त्यासाठी ९ कोटी ९२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख प्रस्तावित आराखड्यात केला होता. मात्र आराखड्यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्याने नव्याने केलेल्या आराखड्यात जि. प.ने १५ काेटींच्या आराखड्यात ११३९ उपाययोजना प्रस्तावित केल्या हाेत्या. आता अंतिम आराखड्यात किती उपाययोजना हाेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.