आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावण्याचा आदेश मागे घ्या; गुरुजींनी केला निषेध

अकाेला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांना वेगवेगळ्या मार्गाने शिक्षकांना अपमानित करण्यात येत असून , आमदार प्रशांत बंब यांचा वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून शिक्षक दिनी साेमवारी काळ्या फिती लावून निषेध नाेंदविण्यात आला. शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, अशीही मागणी शिक्षकांनी केली.

शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचे ओझे वाढतच असून, त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर हाेत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याचेच काम शिक्षकांकडे असावे, यासाठी शिक्षकांच्या संघटनांकडून अनेकदा विविध माध्यमातून मागणी करण्यात आली. मात्र या मागणीची दखल न घेता आता केवळ नकारात्मक दुष्टीकोन समोर ठेवून समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा काहींकडून प्रयत्न होत असल्याचा आराेप शिक्षकांनी केला आहे.

दरम्यान संसदेने केलेल्या कायद्याला हरताळ फासण्याचे काम कोणत्याही यंत्रणेने करु नये, अशा शब्दात साेमवारी शिक्षक सेनेने सरकारच्या कारभारावर हल्लाबाेल केला. आंदाेलनात शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद मोकळकर ,योगेश देवकते ,श्रावण इंगळे ,विजय भांडे, सुरेश धनी ,गजानन ठाकरे ,संतोष टाले, बाळकृष्ण डाखोरे, दिलीप खांदे ,गाणेश आढे, शाम पाठक ,सुरेश कडू, रवींद्र अडागळे यासह शिक्षक सेना महिला पदाधिकारी व शिक्षक सहभागी झाले होते.

सर्वच शिक्षक संघटनांनी एकत्र यावे
काही जण केवळ प्रसिद्धीसाठी समस्त शिक्षकांना वेठीस धरणे योग्य नाही. प्रसिद्धीसाठीच नसती उठाठेव करणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातल्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वच शिक्षक संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहनही शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे यांनी केले आहे.

संबंधितांवर कठाेर कारवाई करा
शिक्षक सेनेने आ.प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. आ. बंब यांनी वेळोवेळी नकारात्मक भूमिका मांडून शिक्षकांना बदनाम करण्याचे काम केल्याचा आराेप शिक्षकांनी केला. शिक्षकांना शिक्षण हक्क अधिनियमातील कामाव्यतिरिक्त कोणतेही काम सोपविल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही, करण्यात यावी, अशीही मागणी शिक्षकांनी केली.

...मग पहा दर्जा
शिक्षकांकडे बीएलओ, शालेय पाेषण आहार, शिष्यवृत्तीसह अन्य अनेक कामे साेपवण्यात येत आहेत. शाळाबाह्य कामांमुळे अध्ययन अध्यापनात अनेक अडचणी येतात. या बाबी सरकारी यंत्रणांना माहीत असतानाही शैक्षणिक गुणवत्ता व दर्जात्मक शिक्षण मिळण्यात अडथळे येतात. त्यामुळे शिक्षकांकडे केवळ शिकवण्याचे पवित्र कार्य सोपवा आणि मग शैक्षणिक दर्जा बघा, असे आव्हानच शिक्षक सेनेने यंत्रणांना दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...