आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत दोन गटांमध्ये रात्री दंगल उसळली. या दंगलीत रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे दगडफेकही सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस दंगल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत होते. या दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाले.
जुने शहरातील हरिहर पेठ, पोळा चौक, जय हिंद चौक या भागात एक गट मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. त्यांनी दिसेल त्याला लक्ष्य करीत दुचाकी आणि ऑटोरिक्षांचे प्रचंड नुकसान केले. दगडफेकही केली. वाढती दंगल लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरासर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील पोलिसांना सूचना दिल्यानंतर जुने शहरात नाकेबंदी करण्यात आली. तरीही दंगेखोर शांत होण्याचे नाव घेत नव्हते. गटाच्या दिशेने दगड आणि विटा येत होत्या. आमदार रणधीर सावरकर यांनी जुने शहर पोलिस स्टेशन गाठले. या वेळी त्यांनी शांततेचे आवाहन केले. दंगल काबूत आणण्यासाठी अमरावती येथून एसआरपीएफच्या तुकड्या बोलावण्यात आल्या होत्या. या घटनेची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर त्यांनीही पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रकार
अकोल्यात दोन गटात झालेल्या दगडफेकीत शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रकार घडल्यानंतर घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाययोजना करत पोलिस प्रशासनाला आदेश देत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले. - रणधीर सावरकर, आमदार
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.