आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:लोणार शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर; वाहतुकीस अडथळा

लोणारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहुतांश रस्त्यावर मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होऊन छोट-मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे. असे असताना देखील स्थानिक नगर परिषद कडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबवली जात नसल्याचे वास्तव चित्र आहे. त्यामुळे मोकाट जनावरे व कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

विकासाच्या प्रगतीकडे झेपावणाऱ्या जगप्रसिद्ध लोणार पर्यटन नगरीत सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे झाली असून काही रस्त्यांची कामे होऊ घातली आहे. परंतु रस्त्यावरच मोकाट जनावरे व कुत्रे उभी राहत असल्याने पादचाऱ्यांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे .त्यामुळे पर्यटन नगरीतील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता शहरात खड्डेविना प्रवास होत असल्यामुळे वाहन चालक ही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पर्यटन नगरीत दिवसेंदिवस मोकाट जनावराची आणि कुत्र्यांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरातून गेलेल्या मुख्य रस्त्यावर मोकाट व पाळीव जनावरांमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रवाशांना व गावात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना देखील या प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.लोणार तालुक्यात ८० ते ८५ खेडे असून यापैकी एकाही ठिकाणी मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची व्यवस्था नाही. पूर्वी नगरपरिषेकडे मोकाट जनावरांचा किंवा नागरिकांच्या शेतात घुसून पिकाची नासाडी करणाऱ्या प्राण्यांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची व्यवस्था होती. परंतु आता नगर परिषद कडे कोंडवाडा नसल्यामुळे शेती असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...