आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 ग्रॅम दागिने हिसकावून पळ:केळीवेळीत दरोडा; गावकऱ्यांनी चौघांना पकडले‎

अकोला‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी पिण्याच्या बहाण्याने दरोडेखोर‎ घरात घुसले. त्यांनी घरातील‎ महिलेच्या पतीला धरून ठेवले‎ आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील‎ सोन्याचे २० ग्रॅम दागिने हिसकावून‎ पळ काढला. मात्र गावकऱ्यांनी चार‎ किमी.पर्यंत त्यांचा पाठलाग करीत‎ त्यांना पकडले. ही घटना केळीवेळी‎ येथे शुक्रवारी दुपारी घडली.‎ केळीवेळी येथील श्रीकृष्ण वनारे‎ यांच्या घरापासून जवळच‎ ओट्यावर चौघेजण बसले होते.‎ नंतर ते त्यांच्या घरी आले आणि‎ वनारे यांच्या पत्नीला पिण्यासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी‎ घरातून पाणी आणले आणि त्यांना‎ पिण्यासाठी दिले.

पाणी पिऊन‎ झाल्यानंतर ते निघून गेले. काही‎ वेळानंतर त्यातील दोघेजण पुन्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आले आणि सरळ घराचे गेट‎ उघडून घरात घुसले. त्यातील एका‎ महिलेने घरात कसे काय घुसले‎ असे विचारताच तेथे असलेले‎ श्रीकृष्ण वनारे यांची कॉलर पकडून‎ एकाने त्यांना मारहाण करत पकडून‎ ठेवले तर दुसऱ्याने महिलेच्या‎ गळ्यातील सोनसाखळी व दागिने‎ हिसकले व पळ काढला. त्यानंतर‎ चाेर चोर असा आरडाओरड‎ केल्याने गावातील लोक जमा झाले‎ व चोरटे पळालेल्या रस्त्याने त्यांचा‎ शोध घेऊ लागली. काही लोकांनी‎ चोरट्यांना पूर्णा नदीकडे‎ शेतशिवारातून मोटरसायकलने‎ जाताना पाहिले होते. त्यानुसार‎ लागलीच त्या दिशेने दुचाकी‎ दामटल्या. व एका चोरट्याला‎ पकडले.

बातम्या आणखी आहेत...