आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:डम्‍पींग ग्राउंडवर केमीकलचा कचरा टाकणाऱ्या व्‍यावसायिकावर 25 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर बायो मेडिकल वेस्ट अर्थात केमीकलचा कचरा टाकण्यास मनाई आहे. मात्र, महापालिकेशी संपर्क न साधता डम्पिंग ग्राऊंडवर केमीकलचा कचरा टाकणाऱ्या व्यावसायीकाकडून महापालिकेच्या वतीने 25 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

बायो मेडिकल वेस्‍ट किंवा कंपनी मधून निघणारा कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी शासनाने मार्गदर्शन सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. या प्रकारच्‍या कचऱ्याची शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त आहे. मात्र काही व्यावसायीक नियमानुसार असा कचऱ्याची विल्हेवाट लावत नाहीत. असाच प्रकार महापालिकेच्या नायगाव येथील डम्पिंग ग्राऊंडवर उघडकीस आला. मनपाला कोणतीही पुर्व कल्‍पना न देता एम.आय.डी.सी. येथील एका कंपनीने केमीकलचा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला.

कंपनीकडून 25 हजार रुपयाचा दंड वसूल

या कचऱ्यात निमोनिया होता. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड परिसरात दुर्गंधी सुटली. यामुळे नागरिक त्रस्त झाले. याबाबत महापालिकेला माहिती देण्यात आली. याबाबत तपास केला असता हा कचरा एमआयडीसीतील एका कंपनीने टाकला असल्याची बाब स्पष्ट झाल्या नंतर मनपा आयुक्‍त कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये आणि राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्णयानुसार संबंधित कंपनीकडून 25 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. कंपनीनेही या दंडाचा भरणा केला. ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, आरोग्‍य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर व आरोग्‍य निरीक्षक जितेंद्र गोराने आदींनी केली. दरम्यान एमआयडीसीतील कंपन्यांनी त्यांचा केमीकल कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकू नये. या कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...