आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणरत्न सदावर्तें, जयश्री पाटील यांची 3 तास चौकशी:एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले 74 हजार 400 रुपये पोलिसांकडे केले परत

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कामगारांचे वकिल विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते व विधिज्ञ जयश्री पाटील यांच्याविरुद्ध अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी दोघांनाही गुुरूवारी (ता.16) अकोट शहर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची ठाण्यात जवळपास 3 तास चौकशी करण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी अकोट येथील एसटी कर्मचाऱ्यांकडून 74 हजार 400 रुपयांची रक्कम घेतली होती तीसुद्धा परत केली आहे.

सदावर्ते याच्याविरुद्ध अकोट पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याप्रकरणी विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी सदावर्ते यांनी जेव्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा त्यांनी वकिलाची फी म्हणून जी रक्कम अकोट येथील एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतली होती. ती रक्कम परत करण्यास तयार आहे, असे न्यायालयाला सांगितले होते. त्या अटीवर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

गुरुवारी अकोट पोलिसांनी त्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील दोघेही हजर झाले, त्यांची चौकशी पोलिस निरीक्षक प्रकाश अहीरे यांनी केली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार रक्कम त्यांनी पोलिसांकडे जमा केली.

पोलिसांनी त्यांना गुन्ह्याच्या तपासाबाबत जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरे सदावर्ते यांनी दिली. तसेच पुढील तपासासाठी जेव्हा जेव्हा पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल तेव्हा ते हजर होतील, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश अहीरे यांनी दिली.

गुन्ह्यातील रक्कम परत केली

गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील हे जामीनावर आहेत. त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार 74 हजार 400 रूपये जमा केले आहेत. तपासाच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. - प्रकाश अहिरे, पोलिस निरीक्षक अकोट शहर

अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वागत

गुरुवारी सकाळीच गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील हे दाखल झाले होते. एसटी आगारामध्ये दोघांचेही एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत स्वागत केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...