आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील मातंग समाजाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने मातंग समाजाची आजपर्यंत फसवणूक केली असे जाहीर करावे, अशी मागणी मातंग समाजाचे नेते गजानन तायडे व गजानन दांडगे यांनी केली. ते गुरुवारी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत दांडगे म्हणाले की, आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मातंग समाजाला वैदिक हिंदुत्ववादी विचारांनी जखडून ठेवले आहे. त्यामुळे मातंग समाजाला अपेक्षित आरक्षणाचा लाभ मिळाला नाही आणि कायम राजकीयदृष्ट्या बेदखल असून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात अनुसूचित जाती या प्रवर्गात असलेल्या मातंग आणि त्यांच्या पोटजातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी हाेत अाहे. तसेच अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मातंग समाजाची आहे.
मातंग समाज व समाजातील नेते वंचित बहुजन आघाडीसोबत राहतील याबाबत त्यांनी जाहीर भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेत मातंग समाजाचे नेते गजानन तायडे व गजानन दांडगे यांनी मातंग समाजातील प्रस्थापित नेत्यांना केले. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे, लहुसेना अध्यक्ष गजानन तायडे, महिला नेत्या सुनंदा चांदणे, उमाताई अंभोरे, युवा आघाडी प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, नारायण मानवटकर, गंगाधर सावळे, सुनील अवचार, गोकुळ मानकर, भूपेंद्र अंभोरे, अशोकराव गायकवाड, रवी तायडे, हर्षल लोखंडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.