आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपिता महात्मा‎ गांधी यांची पुण्यतिथी:वाशीम येथे ‘ रन‎ फॉर लेप्रसी मॅरेथॉन’‎

वाशीम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वाशीम‎ कार्यालयाचे संचालक यांच्या‎ वतीने सोमवार दि. ३० जानेवारी‎ रोजी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक‎ डॉ काळबांडे, जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या‎ प्रमुख उपस्थितीत उद॰घाटन‎ करण्यात आले.‎ यावेळी सहाय्यक संचालक‎ कुष्ठरोग डॉ. संजय देशपांडे,‎ जिल्हा रुग्णालयातील डॉ. मोरे,‎ वैद्यकीय अधिकारी कुष्ठरोग डॉ.‎ मिलींद जाधव, अँथेलेटिक‎ असोसिएशनचे प्रतिनिधी चेतन‎ शेंडे व ज्ञानेश्वर लाळगे, कुष्ठरोग‎ व क्षयरोग विभागातील‎ कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.‎

या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास‎ ९४ मुला-मुलींचा सहभाग‎ नोंदवला. कार्यक्रमाच्या‎ सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा‎ गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ अभिवादन करण्यात आले.‎ त्यानंतर स्पर्श कुष्ठरोग जनजागृती‎ अभियानाची शपथ घेण्यात आली.‎ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी‎ कुष्ठरोग व क्षयरोग विभागाच्या‎ अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...