आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रम:समाजाच्या भल्यासाठी साधुवृत्ती आवश्यक‎; शिवा महाराज बावस्कर यांचा हितोपदेश, यावलखेडला राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव‎

अकोला‎3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधू वृत्तीने समाजाचे सदा कल्याण ‎ होते. अनमोल अशी साधूवृत्ती ही‎ सत्संग व भगवंत भक्तीने निर्माण‎ होते. समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी‎ व मानवीय कल्याणासाठी‎ साधूवृत्तीचे समाजाने जतन करावे,’असा हितोपदेश गाडेगाव येथील ‎विनोदाचार्य हभप शिवा महाराज ‎बावस्कर यांनी केला. यावलखेड‎ येथील हनुमंत मंदीराच्या कलश‎ स्थापना निमित्त यावलखेड येथे ‎ आयोजित राज्यस्तरीय कीर्तन‎ महोत्सवात कीर्तनाचे तृतीय पुष्प ‎भाविकांना अर्पण करतांना त्यांनी‎ आपल्या विनोदी संगीतमय कीर्तनातून‎ तुकोबारायांचा भगवंताशी संवाद‎ साधण्याच्या अभंगाचा परामर्श‎ घेतला.‎

ते पुढे म्हणाले, भगवंताशी संवाद‎ तोच सादु शकतो, ज्याच्या अंगे गुरु‎ तत्त्वाची शक्ती आहे. तुकोबाराय हे‎ खऱ्या अर्थाने जगद्गुरु ठरतात. त्याच‎ अधिकारवाणीने ते विठुरायाची संवाद‎ साधतात. हा संवादही साधू वृत्तीचा‎ परिचारक असल्याचे त्यांनी यावेळी‎ स्पष्ट केले. साधूवृत्ती ही दाढी, माडी,‎ गाडीने येत नाही. आजच्या युगात‎ जेवढे मोठे म्हणून मान्यता पावतात. ते‎ मोठ्या खोडा प्रमाणे आतून पोकळ‎ असतात. उलट साधूवृत्ती ही‎ कोणाशीही वैर, वैमनस्य ठेवीत नाही.‎

‎‎निर्विकार, निर्दोष, प्रामाणिक,‎ सत्यवचनी, शांत व परोपकारी जो‎ आहे, तोच खरा साधू असल्याचे‎ त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‎ तुकोबारायांचे संपूर्ण चरित्र हे‎ साधूवृत्तीचे अधिष्ठान आहे.‎ ‎तुकोबारायांना तत्कालीन समाज‎ व्यवस्थेने नानाविध यातना दिल्यात,‎ पण त्यांनी न डगमगता आपली‎ साधीवृत्ती प्रखर तेवत ठेवत संकटांशी‎ सामना करीत भगवंत प्राप्तीचा मार्ग‎ अनुसरला. त्याचप्रमाणे मुक्ताबाईने‎ पण हालअपेष्टा सहन केल्यात,परंतु‎ साधूवृत्तीला तडा जाऊ दिला नाही. ते‎ पुढे म्हणाले, साधूवृत्तीतील संत हे‎ आई व भगवंत हे पिता ठरतात.

या‎ सूत्राचे महाराजांनी सुरेख स्पष्टीकरण‎ दिले. ते म्हणाले, साधूचे प्रेम हे‎ मातेसमान असते. माता आपला‎ चिमुरडा कितीही शेणा मातीने,‎ शेंबंडाने माखला, तरी त्याला जवळ‎ घेऊन आपल्या पदराने त्याचा शेंबूड‎ वगैरे घाण पुसून त्याला कुरवाळते.‎ तेच वडील बाळ शुद्ध झाल्यावर‎ आपल्या अंगाखांद्यावर त्याला‎ खेळवतात. असा या दोघांमधील‎ फरकच हा संत भगवंता मधील फरक‎ असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान‎ दुपारी हभप भागवताचार्य तुलसीदास‎ महाराज मसने यांची भागवत कथा‎ भक्तीभावत झाली.दरम्यान कीर्तन‎ स्थळी अनेक गावातील ग्रामस्थ‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...