आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई-बाबा ज्या प्रमाणे तुम्ही आमच्या भविष्यासाठी बँकेत फिक्स डिपॉजिट करता त्याच प्रमाणे रेन हार्वेस्टिंग, वृक्षारोपण व प्लास्टीक वापर थांबवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचेही डिपॉजिट करा, असे भावनिक आवाहन शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना पत्रांच्या माध्यमातून केले आहे.
मुलांनी मांडल्या आपल्या व्यथा
सध्या पर्यावरणाची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. माणूस आपल्या स्वार्थासाठी निसर्गावर अत्याचार करतो आहे. यामुळे भावी पिढीला पर्यावरणाच्या विविध संकटांना सामोरे जावे लागणार आहे. हे संकट जर कमी करायचे असल्यास आजपासूनच छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असा संदेश मुलांनी पत्रांमध्ये दिला आहे. पर्यावरण समस्यांची जाण पालकांना व शालेय विद्यार्थ्यांना व्हावी व यामधून मुलांनीच आपल्या पालकांना पर्यावरण संरक्षणासाठी संपुर्ण परिवाराला नियमितपणे काय उपाययोजना करता येतील यासाठी हा उपक्रम कसा महत्त्वाचा ठरेल असे निसर्ग कट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले आहे.
ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त सहभाग
स्पर्धेत शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पत्र लिहून पोस्टाने आयोजकांना पाठवले. त्यानंतर कांचन पटोकार, मंजूश्री कुलकर्णी व अमोल सावंत या परीक्षकांनी निकाल जाहीर केला. शाळा सुरू झाल्यानंतर या सर्व सहभागी स्पर्धकांसाठी मराठी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी बक्षीस वितरण होईल असे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांगितले.
वाढदिवसाला झाडाची बी वाटावी
पत्रात एका विद्यार्थिनीने लिहीले की, उद्या माझ्या वाढदिवसाला चॉटलेट न देता झाडाची बी मी देणार आहे. यासोबतच काही रोपं घरी लावूया असा संदेश देखील देणार आहे.जवळपास कुठे जायचे असल्यास सायकलचा वापर करुया. अनेक विद्यार्थ्यांची अशा युक्त्या आपल्या पालक वर्गाला सुचवल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.