आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवतावाद, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची बिजे रोवत मानवी कल्याणासाठी समाजवादाची तुतारी फुंकणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त ५ फेब्रुवारीला कुरणखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ नागरिक भगवान चिम प्रमुख उपस्थित होते. सर्वप्रथम संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशांत ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरणखेडचे सरपंच पांडे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत रविदास युवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष योगेश विजयकर यांनी केले.
कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ सदस्य सुभाष वाणखडे, शिवसेना सर्कल प्रमुख रंजीत घोगरे, योगेश चिकार प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ नागरिक सुनील नांदुरकर, घनश्याम विजयकर, रवी चव्हाण, प्रल्हाद इंगळे, विजय वाडेकर, संजय कोथळकर, बाळूभाऊ कोथळकर, बाजीराव कोथळकर, वामन गायकवाड, शेखर हरसुलकर, मुकेश हरसुलकर, अमोल इंगळे, गणेश गायकवाड, पिंटू कोथळकर, स्वप्निल चिम, प्रवीण कोथळकर, सागर नांदुरकर, कैलास चव्हाण, सतीश कोथळकर,पंजाब मोहोड, श्याम महाजन, राम महाजन, निखिलेश विजयकर, तेजस विजयकर, विशाल विजयकर, निलेश नांदुरकर, कमलेश नांदुरकर, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप सोनोने उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.