आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य केंद्र:प्राथमिक आराेग्य केंद्रातील 36 दांडीबहाद्दरांची वेतनवाढ राेखली; 14 डाॅक्टरांचाही समावेश

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक आराेग्य केंद्रांत आढळलेल्या बेताल कारभारप्रकरणी ३६ जणांची वेतनवाढ राेखली असून, यात १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याची माहिती शुक्रवारी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या सभेत जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांनी दिली.

जि. प. व पं. स.च्या पथकांनी केलेल्या पाहणीत तीन ठिकाणी कुलूप तर काहीठिकाणी डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले हाेते. बंद तीन प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली हाेती. त्यांच्याकडून खुलासेही मागवले हाेते. याप्रकरणी कारवाई हाेत असल्याची माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसाेले यांनी स्थायीच्या सभेत दिली.

यांच्यावर होणार कारवाई
तपासणीदरम्यान गैरहजर आढळलेल्या १४ वैद्यकीय अधिकारी (नियमित) यांच्यावर कारवाई करण्यात आली. संबंधितांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असमाधानकारक कार्यकाळ असल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तीन स्वास्थ अभ्यंगता (एचव्ही), एक आरोग्य सेविका, सहा सफाई कामगार आणि एक वाहन चालक (नियमित) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. ११ कंत्राटी स्टाफ नर्स यांची वेतनवाढ पाच टक्क्यांनी रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे.

काय आढळले हाेते? बार्शीटाकळी तालुक्यातील ‘पीएससी’मध्ये कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसले. पातूर तालुक्यात पीएचीसींत १८ पैकी एकच कंत्राटी हजर असल्याचे आढळले. काहीठिकाणी अस्वच्छता हाेती. छतातून पाणीही गळत असल्याचे दिसले. आगार परिसररातील ग्रामस्थांशी पथकाने आराेग्य सुविधांबाबत संवाद साधला हाेता. यातून वाहनाची दुरवस्था असणे, रूग्णांच्या नातलग-परिचितांना भाड्याच्या वाहनाने रूग्णाला अन्यत्र हलवावे लागणे, अत्यावश्यक वेळी काेणी हजर नसणे आदी बाबी आढळल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...