आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Improved ... The Salt Of Agneepath's Opposition Was First Seen In Maharashtra; Proclamations By The Student Congress On The Streets; Took The Board In Hand And Became Aggressive; Police In Riot Ge

अग्निपथच्या विरोधाचे लोण महाराष्ट्रात:अकोल्यात विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन; पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला उत्तर भारतानंतर अकोल्यातील युवकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. विद्याथी काँग्रेसने शनिवारी दुपारी निदर्शने केले. यात युवक काँग्रसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अग्निपथ अंतर्गत अग्निवीर योजना जाहीर केली. या योजनेनुसार इंडियन आर्मीमध्ये तरुणांना 4 वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेनुसार दरवर्षी 46 हजार युवकांची निवड करण्यात येणार आहे. चार वर्ष संपताना त्यापैकी 25 टक्के युवकांना सैन्यदलात नोकरी मिळेल. इतर युवकांना चार वर्षांचा कालावधी संपताना जवळपास 11 लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, या योजनेला देशातील अनेक राज्यात विरोध होत आहे. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण दक्षिण भारतात पोहोचले. तेलंगणामध्ये सिकंदराबादमध्ये रेल्वे स्टेशनवर हिंसक आंदोलन करण्यात आले. तरुणांनी एकत्र येत रेल्वे गाड्यांचे आणि स्टेशनवरील दुकानांचे नुकसान केले. दरम्यान या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत असून, याेजना तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

आंदाेलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश तायडे, विद्यार्थी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष अभिजित तवर, जिल्हा महासचिव ऋषिकेश जामोदे, महासचिव अक्षय गडेकर, युवक काँग्रेस पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शारिक, विधानसभा अध्यक्ष अमोल ठोकणे,पवन खात्री, सुरज बेंद्रे, इम्रान पठाण लोकेश सावजी अशीष सरनाईक,अमर साबळे, गोलू गवई,गुड्डू सर्वान, संतोष झंझोटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...