आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसीपी निवडणूकीत उमेदवारांची यादी जाहिर:जि.प, वंचित, महािवकास आघाडी व भाजपमध्ये रंगणार समाना

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियोजन समितीवर (डिपीसी) ग्रामीण मतदारसंघातून अर्थात जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून देण्यासाठी शुक्रवारी (19 ऑगस्ट) उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

9 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात

एकच जागा अविरोध झाली असून, उर्वरित 9 जागांसाठी एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे सहा , महाविकास आघाडीचे (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार व अपक्ष) व भाजप असा समाना रंगणार आहे. मात्र काही जागांसाठी वंचित व महािवकास आघाडीला भाजपकडून अपेक्षा असून, आपल्या बाजूने खेचण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

10 जागांसाठी निवडीची प्रक्रिया

जिल्हा नियोजन समितीवर ग्रामीण मतदारसंघाच्या विविध प्रगवर्गातून 14 सदस्य निवडून देण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यास शासनाने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र नंतर ओबीसी ओरक्षणाच्या तिढ्यामुळे चार जागा राखीव ठेवून 10 जागांसाठी निवडीची प्रक्रिया प्रशासाकडून सुरू करण्यात आली. 10 जागांसाठी एकूण अर्ज करणाऱ्यांची संख्या 28 झाली होती. अखेर 18 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लढतीचे चित्र स्प‌ष्ट झाले. एक जागा अविरोध झाली असून, उर्वरित 9 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत.

होणार राजकीय संघर्ष

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती पदे वंचितकडे आहेत. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या दोन सभापती पदांच्या निवडणुकीत महािवकास आघाडीने भाजपच्या मदतीने विजय मिळवला होता. सध्या 53 सदस्य संख्या असलेल्या जि.प.मध्ये वंचिते 25 आणि महािवकास आघाडीचे 23 व भाजपचे 5 सदस्य आहेत. महािवकास आघाडीतील शिवसेनेचे 12, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस​​​​​​​चे प्रत्येकि 4, अपक्ष 2, प्रहार जनशक्ति पक्षाचा एक सदस्य आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणूक व महािवकास आघाडीच्या अपक्ष सभापतीला खात्यांचा प्रभार न देणे यांमुळे सत्ताधारी -विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्याची संधी डिपीसीच्या निवडणुकीत शोधताना दिसून येत आहे.

बैठक ठरली निष्पळ

डिपीसी निवडणूक बिनविरोधक होण्यासाठी वंचित, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस​​​​​​​ची बैठक झाली होती. वंचितने महाविकास आघाडीसमोर 10 पैकी 3 जागांचे प्रस्ताव ठेवला होता.मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस​​​​​​​, प्रहार जनशक्ति पक्ष, अपक्षांचा सहभाग असलेल्या महािवकास आघाडीने किमान 4 ते 5 जागा तरी आघाडीला हव्या आहेत, अशी मागणी केली होती. दोन्ही आघाड्या आपापल्या आग्रहावर ठाम राहिल्याने बैठक निष्फळ ठरली होती.

बातम्या आणखी आहेत...