आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Samriddhi Highway Under Construction Bridge Collapses Second Incident In Washim District; An Attempt By The Contractor To Press The Mortar Of The Collapsed Bridge

समृद्धी महामार्गाचा निर्माणाधीन पूल कोसळला:वाशिम जिल्ह्यात दुसऱ्यांदा घटना; कंत्राटदाराकडून मलमा दाबण्याचा प्रयत्न!

वाशिम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यासह राज्यातील महत्वकांक्षी असलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प, वारंवार होणाऱ्या दुरघटनांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर यापूर्वी पुल पडण्याची मालिका सुरुच आहे. जऊळका परिसरातील ओवर ब्रिज पुलाचा गर्डर व काही भाग गुरुवारी (ता. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास खाली कोसळला.

जीवीतहानी नाही

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचा पॅकेज क्रमांक 5 मध्ये जऊळका परिसरातील साखळी क्रमांक 219 वर निर्माणधीन वन्यजीवाच्या रहदारीसाठी करण्यात येत असलेल्या, ओवर ब्रिज पुलाचा गर्डर व काही भाग खाली कोसळला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन क्रेनमशिनचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

घटनेची लपवाछपवी

ओवर ब्रिज पुलाचा गर्डर कोसळल्यानंतर घटना लपवण्यासाठी संबंधित कंपनी, कंत्राटदाराकडुन कोसळलेल्या पुलाचा मलमा, मुरमाखाली दाबण्यात आला. तसेच काही मटेरियल दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकण्यात आले. आणि रातोरात जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने संबंधित पुलाचा तुटलेला मलमा ( ढिगारा ) लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच कोसळलेल्या ओवर ब्रिज पुला कडे जाणारा रस्ता ही बंद करण्यात आला होता. यांसंदर्भात कंपनीचे कर्मचारी आणि कंत्राटदारातर्फे प्रतिक्रिया देण्यासाठी काम करणाऱ्यांपैकी कोणीच समोर आले नाही.

''समृद्धी महामार्गावरील पुलाचा गर्डर व फुलाचा काही भाग कोसळला ही माहिती समजताच आम्ही तेथे गेलो. पुलाचा काही भाग खचलेल्या दिसला आणि तेथुन काही अंतरावर खचलेल्या पुलावरील गर्डरचा मलमा दिसला. ही घटना काल सायंकाळी घडल्याचे तेथील तेथील काही व्यक्तींनी सांगितले. आणि हा सगळा प्रकार संबंधित कंत्राटदारा कडुन लपवण्याचे प्रयत्न चालु होते. त्यामुळे या कामाबाबत शंका निर्माण होत आहे.- गोपाल राऊत, परिसरातील शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...