आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावरील दुभाजक व पुलाच्या कठड्याला कारने जोरदार धडक दिली.
गुजरातचे दाम्पत्य जखमी
कारमध्ये गुजरात येथील गोयल दाम्पत्य होते. हे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जात होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून पुरुषाच्या डोक्यालाही इजा झालेली आहे.
जखमींना अकोला येथे हलवले
वनोजा येथील गोपाल राऊत, सोपनील चौधरी, बाबाराव अवगण, दिलीप अवगण हे नागरिक समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब 108 वर फोन केला आणि अपघाती कारमधील जखमींना शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमींवर तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले आहे.
तासाभरानंतर रुग्णवाहिका आली
दरम्यान, अपघातग्रस्त वाहन दिसताच नागरिकांनी तातडीने 108 क्रमांकावर माहितीत दिली. त्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे जखमींना मदत मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे समृद्धी महामार्गावर तातडीने मदत मिळण्याचा प्रशासनाने केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. माहामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपघातग्रस्तांना लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.