आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथे क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियर महाराष्ट्र सीजन ३ ग्रुप सी मधून अकोल्याची साना संजय खडसे हिने प्रथम क्रमांक प्राप्त करून या स्पर्धेचा विजेता होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. बी ग्रुप मध्ये विजेता ठरली शरण्या गणेश भाकरे माउंट कारमेल इंटरनॅशनल स्कूल तर बी ग्रुपमध्ये चिन्मय मंदार सावजी उपविजेता ठरला तर सामीया अब्दुल इरफान ज्यूबली इंग्लिश स्कूल हिला उत्कृष्ट बेस्ट वॉक पुरस्कार मिळाला, तर अ ग्रुप मध्ये, निष्ठा मंदार सावजी के जी टू ची हिने २०० देशाच्या राजधानी सलग सांगितल्या त्याबद्दल व उत्कृष्ट स्माईल आणि आईज पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात अकोला येथील स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली.
क्रिएटिव्ह ग्रुप छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जानेवारीत जिल्हास्तरावर ऑडिशन घेऊन वय वर्ष १० ते १४ या वयोगटात महाराष्ट्र स्तरावर निवड झाली, महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑडिशनची प्रक्रिया राबवून नंतर पुणे येथे ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये पारंपरिक ड्रेसमध्ये परिचय, कौशल्य (टॅलेंट )सादरीकरण, रॅम्प वॉक, जनरल नॉलेज वर आधारित प्रश्नाची उत्तरे, एक मिनिटांमध्ये वेळेवर येणाऱ्या विषयावर, माहिती देणे, व ज्यूरी राऊंड मध्ये आत्मविश्वासाने अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. पल्लवी कौशिक मिसेस युनिव्हर्सल २०१७ व रवी जयस्वाल यांच्या हस्ते ज्युनियर महाराष्ट्र सौंदर्यवती विजेता मुकुट घालून सन्मान करण्यात आला.
लहानपणापासून घेतलेले शिक्षण, ज्ञान, आणि आत्मविश्वासाच्या बळावर, हे यश संपादन केले असल्याचे सानाने सांगितले व प्रशासकीय सेवेसोबत सामाजिक कार्यात असणारे माझे वडील आणि आम्हाला सुद्धा सामाजिक दृष्टी मिळत आहे. त्यामुळे माझे वडील माझे आदर्श आहेत त्यामुळे मी आयएएस बनून समाज सेवा करणार असल्याचेही साना म्हणाली. वडील निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, आई नीता खडसे, भाऊ संनीत खडसे, मामा अमोल बेलखेडे, मनीषा बेलखेडे, प्रभात किड्सचे संचालक डाॅ. गजानन नारे, वंदना नारे, नंदकुमार डंबाळे, सचिन बुरघाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.