आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:संत गजानन महाराज समाधी सोहळा; कस्तुरी संस्थेेतर्फे विविध कार्यक्रम

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

११२ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर १९१० रोजी संत गजानन महाराजांनी शेगावी समाधी घेतली. कस्तुरी परिसरात श्री संत गजानन महाराजांना अभिषेक, महापूजा, यज्ञ व महाआरती करून ‘श्रीं’च्या समाधीसोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयाेजित केला हाेता. या वेळी महादेव लहाने व अशोक गिरी पूजेचे यजमान होते. पौरोहित्य महेश कापडी, विलास मुंगी यांनी केले. याप्रसंगी अशोक गिरी, महादेव लहाने व मोहन भोजापुरे यांचा कस्तुरीतर्फे सत्कार केला.

कस्तुरी वानप्रस्थाश्रमातील वृद्धांना मान्यवरांच्या हस्ते नवीन वस्त्र दिले. या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने केली. याप्रसंगी माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी प्राचार्य डॉ. शांताराम बुटे, विजय व सुनीता घाटे, मोहन व सुनिता भोजापुरे, प्रा. अनिल व सीमा मुळे, सोमेश्वर पेठकर, नागोराव मोहोड, दिगंबर कोरडे, भास्कर जगताप, प्रशांत पाटील, अनिता इधोळ, संजय बुटोले, सचिन मोडक, प्रकाश धवने, अविनाश खुंटे यांनी ‘श्रीं’च्या प्रती भक्ती प्रकट केली. वसंतराव खोटरे, मोहन भोजापुरे, अनिल मुळे, प्रतीक्षा अलकरी पुणे, प्रभाकर संभाजी फुलारी, अनिता इधोळ, मोहीत शर्मा, दिगंबर कोरडे यांनी देणगी दिली.

बातम्या आणखी आहेत...