आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचा पालखी सोहळा सोमवारी ६ जूनला सकाळी शेगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पारस, भौरद येथील मुक्कामानंतर ही वारी शहरात बुधवारी जूनला दाखल होत आहे. महाराजांची पालखी दोन दविस येथे मुक्कामी राहणार आहे. शेगाव संस्थांनकडून शहरातील पालखीचा मार्ग मंगळवारी जाहीर केला. कोरोनामुळे दोन वर्षानंतर पालखी अकोल्यामध्ये येत आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह आहे.
शहरामध्ये ‘श्री’च्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त चौका-चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहे. स्वागतासाठी जागोजागो रांगोळी काढण्यात येत आहेत. या वेळी वारकऱ्यांना पेयजल व खाद्यपदार्थांचे वाटप करणार आहे. याशविाय ववििध संस्था मार्गांवर पालखीचे पूजन करणार आहे.
मुक्कामाचे ठिकाण सज्ज : यंदा पालखीसोबत ७०० वारकरी आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नविास, भोजनाची तयारी करण्यात आली आहे. याशविाय येथे चपला दुरुस्ती, दाढी-कटिंग, तसेच कपडे शविण्यासाठी टेलरची व्यवस्था
केली आहे.
उद्याचा पालखीचा मार्ग : मुंगीलाल बाजोरीया शाळेतून टपाल कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी नविासस्थानासमोरून, अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवनासमोरून नेहरू पार्क जवळून, जुने इन्कम टॅक्स चौक, आदर्श कॉलनी शाळा क्रं. १६ मध्ये सकाळी ९ ते १२, तेथून पुढे सिंधी कॅम्प मार्गे, अशोक वाटिकेमागून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून, सरकारी बगीचा, खोलेश्वर, कोतवाली, श्री राजेश्वर मंदिरासमोरून हरिहर पेठ मुक्कामी राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.