आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षणाचा श्रीगणेशा:सारकिन्ही गावात घरोघरी भरतात शाळा, भिंती झाल्या फळा; शिक्षकांनी बनवले 28 हजार स्वाध्याय कार्ड‌्स

अकोला / महेश घोराळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना लॉकडाऊनच्या काळातही शिक्षणात खंड नाही, ऑनलाइन शिक्षणातील अडथळ्यांवर केली मात

बंद शाळांच्या समस्येवर अकोला जिल्ह्याच्या सारकिन्ही गावातील जिल्हा परिषद शिक्षकांनी स्वाध्याय कार्ड‌्सचा उपाय शोधून काढला आहे. गावातील १६० विद्यार्थ्यांसाठी त्यांनी २८ हजार शैक्षणिक कार्ड््स तयार केली असून घरोघरी जाऊन ती विद्यार्थ्यांना दिली आहे. गावातील भिंतींवरही अभ्यासाचे धडे रंगवत संपूर्ण गावाचे शाळेत रूपांतर केले आहे.

सारकिन्ही (ता.बार्शी टाकळी) गावात शिरताच तुमचा अभ्यास सुरू होतो. शिक्षकांनी गावातील भिंतीवर अभ्यासाची सूत्रे लिहिली आहेत. प्रत्येक घरात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्ड््स वाटली आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्याचा अभ्यास झाल्यावर संध्याकाळी शिक्षक त्यांना फोन करतात व अभ्यासाची पडताळणी करून शंकांचे निरसन करतात. यातून विद्यार्थ्यांची घरातच शाळा सुरू आहे.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने सारकिन्ही येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. इंग्रजी, गणित आणि भाषा विषयांचे तब्बल २८ हजार कार्ड‌्स तयार केले आहेत. या कार्डच्या आधारे विद्यार्थ्यांनी अगदी सहज कृती कार्यक्रमातून अभ्यास करता येतो. विद्यार्थ्यांना कसे शिकवावे यासंदर्भातील सूचनाही पालकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी अभ्यास करतात की नाही यावर पालक लक्ष ठेवतात. जिल्ह्यासह राज्यात या उपक्रमाचे कौतुक होत असल्याचे मुख्याध्यापक ब्रह्मसिंग राठोड आणि वर्गशिक्षक ज्ञानदीप मानकर सांगतात.

असा झाला फायदा
- आॅनलाइन अडथळ्यांवर मात.
- इयत्ता आठवीपर्यंतचे विद्यार्थी अभ्यासक्रमात गुंतून गेले.
- पालक स्वतः विद्यार्थ्यांना शिकवू लागले. संवाद वाढला.
- संख्यावाचन, गणिते, शब्दनिर्मिती, स्पेलिंग पाठांतर शक्य.

असा आहे स्वयं अध्ययन संच
- विषयानुसार स्वयंअध्ययन स्वाध्याय कार्ड
- सूचना आणि अभ्यासाच्या कृतीबाबत मार्गदर्शन
- गोष्टींसह वैज्ञानिक पुस्तके आणि पाठ्यपुस्तके.

बालभारतीचे क्यूआर कोड, पालकांचा सहभाग
गावात सहा ठिकाणी बालभारतीचे क्यूआर कोड स्टेशन सुरू केले असून कोडच्या मोठ्या झेराॅक्स लावल्या आहेत. कोणते कोड कोणत्या पाठ्यक्रमाचे आहेत याचा तपशील दिल्याने पालक मोबाइलमध्ये कोड घेऊन जात आहेत. - ब्रह्मसिंग राठोड, मुख्याध्यापक