आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती‎:धाबेकर महाविद्यालयात‎ सावित्रीबाई फुले जयंती‎

अकोला‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक खडकी येथील धाबेकर कला‎ महाविद्यालयात शारीरिक शिक्षण‎ विभाग प्रमुख डॉ. लोहकपुरे यांच्या‎ अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले यांची‎ जयंती साजरी करण्यात आली. या वेळी‎ समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमरीश‎ गावंडे व प्रा. स्वाती फाले उपस्थित होते.‎ सावित्रीबाई फुले यांनी स्त्री‎ शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना जनतेच्या‎ प्रचंड रोषाला बळी पडून प्रसंगी अंगावर‎ शेण माती झेलून न डगमगता कार्य‎ सुरूच ठेवले.

यासाठी महात्मा फुले‎ यांची खंबीर साथ त्यांना लाभली.‎ महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई आणि‎ महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याची‎ विस्तृत माहिती डॉ. लोहकपुरे यांनी‎ दिली. डॉ. अमरीश गावंडे यांनी‎ सावित्रीबाई यांच्या कार्याला अभिवादन‎ करत त्यांच्यामुळेच आज महिला‎ विविध क्षेत्रात आपली छाप उमटवून‎ आपल्याला सिद्ध करत असल्याचे‎ त्यांनी सांगितले. देशातील विविध‎ क्षेत्रातील यशस्वी महिलांची त्यांनी‎ यावेळी उदाहरणे दिली. प्रा. फाले यांनी‎ सावित्रीबाई यांचा जीवनपट थोडक्यात‎ सांगितला. याप्रसंगी महाविद्यालयाचे‎ विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षकेतर‎ कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...