आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​व्हॉल्व्हची समस्या:शहरातील रेल्वे स्थानकासमोरील दोन जलकुंभांचे ‘स्काडा ऑटोमेशन’ पूर्ण

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्थानका समोरील दोन जलकुंभांवर स्काडा ऑटोमेशन प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र जलकुंभाच्या व्हॉल्व्हची समस्या उद्भवल्याने या दोन्ही जलकुंभातून २३ जूनला पाणी पुरवठ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सबलीकरणाची विविध कामे सुरु आहेत. यापैकी काही पूर्ण झाली आहेत.

पाणी पुरवठा योजनेचे जाळे मोठे असल्याने कर्मचाऱ्यांकरवी सर्व कामे करणे अवघड होत आहे. तसेच योजनेवरील तांत्रिक कर्मचारी दर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच कमी मनुष्यबळाचा वापर करुन पाणी पुरवठा योजनांमधील होणाऱ्या प्रक्रियेमध्ये स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्कॉडा ऑटोमेशन पद्धतीमुळे पाण्याची गुणवत्ता व संयंत्रणाचे विविध प्रमाणके ऑनलाइन पाहता येणार आहे. रेल्वे स्थानका समोरील दोन जलकुंभांवर ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी मंगळवार २१ व बुधवार २२ जूनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी २३ जूनला पाणी पुरवठा होईल, अशी माहिती विभागाने दिली होती. मात्र व्हॉल्व्हची समस्या उद्भवली असून, दुरुस्ती सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यास गुरुवारी २३ जूनला पाणी पुरवठा होवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...