आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 हजार 97 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा:15 केंद्रावर झालेल्या परीक्षेत 200 विद्यार्थी गैरहजर

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवीनंतरची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. 19) अकोला जिल्ह्यातील 15 केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 3 हजार 300 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी रविवारी 3 हजार 97 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 203 विद्यार्थी अनुपस्थित होते.

शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

परीक्षेचा पहिला पेपर 10.30 ते 12 तसेच शालेय क्षमता चाचणी दुसरा पेपर 1.30 ते 3 वाजेपर्यंत घेण्यात आला. अकोला जिल्हयात भारत विद्यालय तापडिया नगर, जागृती विद्यालय, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल, मांगीलाल शर्मा विद्यालय, स्वावलंबी विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय अकोट, श्री सरस्वती विद्यालय, श्री नर्सिंग विद्यालय, धनाबाई विद्यालय बाळापूर, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शिटाकळी, मुर्तीजापुर हायस्कूल, शहा बाबू उर्दू हायस्कूल पातुर, सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा, सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड, भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मुर्तीजापुर केद्रांवर परीक्षा संपन्न झाली.

अशी राहिली उपस्थिती

भारत विद्यालय अकोला 245, जागृती विद्यालय अकोला 260, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल अकोला 205, मांगीलाल शर्मा विद्यालय अकोला 207, स्वावलंबी विद्यालय अकोला 128, श्री शिवाजी विद्यालय अकोट 223, श्री सरस्वती विद्यालय अकोट 210, श्री नर्सिंग विद्यालय अकोट 139, धनाबाई विद्यालय बाळापूर 176, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शिटाकळी 256, मूर्तिजापूर हायस्कूल मुर्तीजापुर 141, शहा बाबू उर्दू हायस्कूल पातूर 253, सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा 325, सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड 193, भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मुर्तीजापुर 136 अशी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

योग्य नियोजनात परीक्षा

कोरोना काळानंतर ही पहिली शिष्यवृत्ती परीक्षा होती. परीक्षा केंद्र संचालक मनीषा अभ्यंकर, अरुण राऊत, इम्तियाज अहमद खान, भानुदास एन्नावार, रोहित शर्मा, संजय वालशिंगे, भूषण ठाकूर, दीपक देव, गंगाधर सोळंके, श्रीसुरेंद्र देशमुख, मोहम्मद असलम, मोहम्मद इक्बाल, राजेंद्र देशमुख, रजनी वालोकार, रविंद्र पारधी यांनी जि. प. शिक्षणाधिकारी माध्य. डॉ. सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा झाली. यावेळी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे, जिल्हा विज्ञान मंच समन्वयक डॉ. रवींद्र भास्कर, शब्बीर हुसेन, इक्बाल भाई यांनी परीक्षेचे नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...