आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष्टिक पोषण आहार:शालेय पौष्टिक पोषण आहार मुलांच्या विकासासाठी आवश्यक : पालकमंत्री

मूर्तिजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शालेय विद्यार्थ्यांना पौष्टीक पोषण आहार हा मुलांच्या शारिरीक व बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेचे या क्षेत्रातील काम कौतुकास्पद असून, हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवू,’ असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. ते मूर्तिजापूर येथे पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती सम्राट डोंगरदिवे, शिक्षण विभागाचे उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, नगर परिषदेचे मुख्यधिकारी विजय लोहकर, सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचे समन्वयक संतोष अलाट, मनोज गवई, जिल्हा समन्वयक अधीक्षक संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.

मूर्तिजापूर नगरपरिषदेतील १४ शाळेतील १०५० विद्यार्थ्यांना शालेय पौष्टीक आहार साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ पावडर वाटप करण्यात येणार आहे. ही पावडर दुधात मिसळून मुलांना द्यावी, असे सत्यसाई अन्नपूर्णा संस्थाचे राष्ट्रीय समन्वयक संतोष अलाट यांनी या पावडरचे आहारातील महत्त्व उपस्थिताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप सोनखासकर यांनी केले तर आभार राजेश भुगूल यांनी मानले.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न : कार्यक्रमात पालकमंत्री कडू यांनी उपस्थित मुलांना साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ मिक्सचे वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधताना पालकमंत्री कडू म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करु. तसेच शिक्षण विभागाच्या सहकार्याने सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेमार्फत पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप सुरु झाले असून, मुर्तिजापूर नगरपरिषद असा उपक्रम राबवणारी पहिलीच नगरपरिषद असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...