आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज दाखल‎ करण्याचा‎ कालावधी संपला‎:बाजार समिती निवडणुकीच्या‎ उमेदवारी अर्जांची उद्या छाननी‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या‎ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज‎ भरण्याची मुदत साेमवारी संपली.‎ समित्यांमधील चार मतदारसंघांत‎ एकूण १२९०५ मतदार असून, सहकार‎ राजकारणात हे मतदार महत्त्वाची‎ भूमिका बजावणार आहेत. १२६‎ जागांसाठी निवडणूक प्रक्रियात हाेत‎ असून, सहकार राजकारण ढवळून‎ निघत आहे.‎ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठीही‎ प्रक्रिया २३ डिसेंबर २०२२पासून सुरू‎ हाेणार हाेती. मात्र निवडणुकांबाबत‎ उच्च न्यायालयात याचिका दाखल‎ करण्यात आल्या हाेत्या. न्यालयाने‎ अंतिरिम आदेश जारी केला. त्यानंतर‎ राज्य सहकारी िनवडणूक‎ प्राधिकारणाने बाजार समित्यांच्या‎ निवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू‎ करण्यासाठी िजल्हा उपनिबंधकांना‎ आदेश जारी केला.

या आदेशात‎ काेणत्या कालावधीत काेणती प्रक्रिया‎ राबवावी, हेही नमूद करण्यात आले.‎ त्यानुसार उमेदारी अर्ज भरण्याची‎ प्रक्रिया ३ एप्रिल राेजी संपली.‎ गुरुवारी हाेणार जाहीर‎ उमेदवारी अर्जांची छाननी ५‎ एप्रिलला आिण वैध अर्ज ६ एप्रिल‎ राेजी जाहीर हाेणार आहेत. उमेदवारी‎ अर्ज २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता‎ येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी‎ आिण िचन्हांचे िवतरण २१ एप्रिल राेजी‎ हाेणार आहे. मतदान २८ एप्रिल राेजी‎ हाेणार असून, मतमाेजणी‎ मतदानाच्या तीन दिवसांच्या आत‎ हाेणार आहे.‎

मूर्तिजापुरात १८‎ जागांसाठी ८२ अर्ज‎ मूर्तिजापूर| कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या निवडून द्यावयाच्या १८‎ जागांसाठी ८२ उमेदवारी अर्ज सादर‎ केले आहेत. साेमवार ३ एप्रिलला‎ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची‎ शेवटच्या दिवशी ५० उमेदवारी अर्ज‎ दाखल झाले.त्यापूर्वी ३२ उमेदवारी‎ अर्ज दाखल करण्यात आले होते.‎ निवडणुकीकरता सेवा सहकारी‎ सोसायटी मतदारसंघातून‎ ११,ग्रामपंचायत मतदार संघातून ४‎ जागा, व्यापारी व अडते‎ मतदारसंघातून २ , हमाल व मापारी‎ मतदारसंघातून १ जागा अशा एकूण १८‎ जागांकरता मतदान होणार आहे.‎