आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाच्या मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने गुरुवारी पश्चिम झोनमधील थकीत कराचा भरणा न केल्याने मालमत्तेला सील केले.मनपासमोर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे आव्हान आहे. थकीत करावर नियमाप्रमाणे मनपाला दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारता येते. या व्याजाचा फटका नागरिकांना बसू नये, यासाठी मनपाने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अभय योजना राबवली. चालू आर्थिक वर्षातही जून महिन्यापर्यंत ही योजना सुरू ठेवली होती. त्यानंतर ही योजना बंद केली.
मात्र विविध राजकीय पक्षांनी अभय योजना राबवण्याचे आवाहन केल्यानंतर प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात (एक महिन्यापुरती) ही योजना राबवली. परंतु अद्यापही मनपाला कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करावा लागणार आहे. या अनुषंगानेच आता थकीत मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता सील केल्या.पश्चिम झोन क्षेत्रातील आश्रय नगर, डाबकी रोड वरील गट क्र. बी-१३, मालमत्ता क्र. २४९४ माधुरी वाईन बारकडे सन २०१७-२०१८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा एक लाख ३५ हजार ६९१ रुपये मालमत्ता कर थकीत होता. थकीत कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही थकीत कराचा भरणा न केल्याने मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने अखेर मालमत्तेला सील लावले. ही कारवाई सहायक कर अधीक्षक गजानन घोंगे, प्रवीण भालेराव, दिनेश देहलीवाले, प्रकाश मालगे आदींनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.