आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाला बुधवारी १ जूनला प्रारंभ झाला. पहिल्याच दविशी ९१२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. ६ जूनपर्यंत चालणारा हा महोत्सव प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाला. अन्य तालुक्यातील शुभारंभही याचवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला. बियाणे महोत्सव एका अर्थाने ‘क्रांती’ची सुरुवात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कडू यांनी केले. बियाणे महोत्सवाच्या मुख्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर,कृषी उपसंचालक मनोहर मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा सूचना वजि्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार नीलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिंदे, शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. खोत म्हणाले की, या महोत्सवात पहिल्याच दविशी २,२०० क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून, ९१२ क्विंटल बियाणे विक्री झाले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी या महोत्सवाविषयी मनोगत व्यक्त केले. खते, फवारणीची औषधे उपलब्ध करून देणार ः बियाणे महोत्सवासारख्या नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी हिंमत करावी लागते, असे पालकमंत्री कडू म्हणाले. शेतकरी शेतकऱ्यांना बियाणे विकत देईल. शेतकरी हा शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही. विविध बियाणे उत्पादक कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. ही शेतकऱ्यांची एक प्रकारची लूट आहे. मात्र केवळ अशी ओरड करून चालणार नाही, त्यासाठी बियाणे महोत्सवाची कल्पना हा एक उत्तम पर्याय आहे. या उपक्रमामुळे किमान ५ ते ६ कोटी रुपयांची शेतकऱ्यांची बचत होईल, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, असेही ते म्हणाले. प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहजिे,असे आवाहन पालकमंत्री कडू यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकरी हा एक संशोधक आहे, हे ही या उपक्रमातून दिसून आले आहे. या उपक्रमाचा पुढचा टप्पा शेतकऱ्यांना खते, फवारणीची औषधे उपलब्ध करून देणे हा असेल,असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.