आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार मेळावा:रोजगार मेळाव्यात 57 पदांसाठी उद्या राबवणार निवड प्रक्रिया, जिल्ह्यामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ५७ पदांसाठी निवड प्रक्रिया होणार आहे. त्यात इयत्ता दहावी ते पदवीधरांना संधी मिळणार आहे.

या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले. आता कोरोनाच्या पृष्ठभूमीवर निर्बंध झपाट्याने शिथिल करण्यात येत असून, रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत.तसेच आता बेरोजगार उमेदवारांकरीता पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शुक्रवारी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर केले आहे. रोजगार मेळाव्‍यात कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र वाडेगांव, प्रज्ञा सोशल वेलफेअर अॅण्‍ड एज्‍युकेशन सोसायटी अकोला, गेम्‍बो मार्क ट्रेड लिंक प्रा.लि. अकोला या कंपनीचे एचआर प्रतिनिधीकडून सर्वसाधारणपणे दहावी व बारावी, पदवी, पदवीधर, पदविका या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांची ५७ रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

येथे करावी लागणार नोंदणी
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्‍या - www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळाला भेट देऊन सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा लागणार आहे. तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज्या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तत्काळ नोंदणी करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अर्ज करुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...