आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:स्व. विनायक मेटे यांना विविध सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे सामूहिक श्रद्धांजली

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासाठी झटणारे लढवय्ये नेतृत्व, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने मराठा समाजात शोककळा पसरली असून, विविध संघटनांतर्फे त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली.

स्व. विनायकराव मेटे यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांना सर्व सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जि. प. कर्मचारी कल्याण भवन येथे सभेचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम स्व. मेटे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात करण्यात अाला. त्यानंतर उपस्थित विविध सामाजिक व राजकीय नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन भावपूर्ण सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.

याप्रसंगी अामदार गोवर्धन शर्मा, अा. वसंत खंडेलवाल, माजी आमदार वसंतराव खोटरे, बबनराव चौधरी, डॉ. अभय पाटील, अशोकराव अमानकर, श्रीकांत पाटील, धर्यवर्धन पुंडकर, विनायकराव पवार, अविनाश देशमुख, विजय मालोकार, कृष्णा अंधारे, विजय अग्रवाल, जयंत मसने, अशोक पटोकार, संदीप पाटील, प्रभजितसिंग बच्छेर, डॉ. अशोक ओळंबे, पुरुषोत्तम दातकर, राजेंद्र पातोडे, अक्षय झटाले, शिवा मोहोड, मधुकरराव देशमुख, मनोहरराव हरणे, पंकज साबळे, पूजा काळे, कल्पना बिडवे, आशिष पवित्रकार, कपिल रावदेव, प्रदीप चोरे, पंकज जायले, मंगेश काळे, नीलेश देव, विनोद बोर्डे, प्रशांत भारसाकळे, निखिल ठाकरे, राम मुळे, सचिन गोमासे, अॅड. संतोष गावंडे, संदीप महल्ले, सुनील जानोरकर, सुरेश पाटील, घनश्याम दांदळे, मनीष मोहोड, शिवाजी पटोकार, सूर्यकांत ढोमणे, दत्ता पाकधने, विठ्ठल गाडे, राजेश देशमुख, अक्षय झटाले, निशिकांत बडगे, मनीष हिवराळे, सुरेश ठाकरे, संजय सूर्यवंशी, प्रदीप लुगडे, दिनकरराव सरप, शामराव वाहुरवाघ, गजानन कुटे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन अविनाश पाटील नाकट यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...