आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:महान येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम

बार्शीटाकळी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा महान येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते. उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका बजावत अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत सहभाग नोंदविला. संस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी गीत व इतर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांची पूर्वतयारी विज्ञान अध्यापिका शगुफ्ता जमाल यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहिद इक्बाल खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक इकराम खान, कदिर खान, नदीम खान, मो. सज्जाद, रिजवन अहेमद, गुल ए राणा, रुबिना, जहेद उर रहेमान, मुजीब बेग आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगुफ्ता जमाल यांनी केले. र्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...