आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले राज्यस्तरीय ज्येष्ठ साहित्यिक संमेलन:ज्येष्ठांनी नव्या पिढीला साहित्यातून दिशा द्यावी : डॉ. श्यामसुंदर निकम

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजची पिढी वित्तरसामध्ये आनंदी आहे. त्यांना मुल्यवर्धक विचारांच्या लसीची गरज आहे. हे विचार ज्येष्ठांनी साहित्य लेखणातून पेरावे. भविष्यातील समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी ही काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले.

सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था आणि सावित्री फाउंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. पुरुषोत्तम बोरकर साहित्य नगरी जे. आर. डी. टाटा स्कूल सभागृह स्नेहाशब्द वाटिका समोर बार्शीटाकली रोड अकोला येथे रविवारी 12 जून रोजी करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

यावेळी संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर जळगाव खान्देश, स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संजय चौधरी, कार्याध्यक्ष संत साहित्य अभ्यासक तुळशिराम बोबडे होते. यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, अभियंता व लेखक वा. पा. जाधव, कवियत्री अॅड. मंगला नागरे, प्रा. सदाशिव शेळके, शिक्षणाधिकारी माध्य. डॉ. सुचिता पाटेकर प्रमुख पाहुणे लाभले होते.

सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी मराठी भाषेचा इतिहास उलगडला. साहित्य हे मानवी मनाला चिरतरूण ठेवते. त्यामुळे ज्येष्ठांनी साहित्य आस्वाद तसेच लेखक अवश्य करावे. जीवनामध्ये संकट येतात. संकट पार्ट ऑफ लाईफ असतात, मात्र त्याच्या सामना निडरपणे करणे, हे ऑर्ट ऑफ लाईफ आहे. बौद्धिक प्रगतीमुळे नैराश्य येत नाही. सोबत निरोगी शरीर राखणे महत्त्वाचे, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. संमेलनामध्ये साहित्य क्षेत्रातील लेखक, कविंना साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

तंत्रयुगात भावनेचा ओलावा साहित्यातून रूजावा

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. माणूस माणसाचे शोषण करीत आहे. लेखकांनी केवळ स्वत:च्या समाधानासाठी लेखक करू नये. सामाजिक समस्यांची जाणीव ठेवून लिहित व्हावे. लेखणामध्ये सर्जनशिलता, संवेदना पेराव्या. तंत्रयुगात भावनेचा ओलावा साहित्यातूनच निर्माण होऊ शकतो, असे संमेलनात मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून शशिकांत हिंगोणेकर जळगाव खान्देश यांनी केले.

विविध सत्रांमध्ये सांस्कृतिक मेजवाणी

संमेलनामध्ये उदघाटन सत्रानंतर सशस्त्र क्रांतिकारकांचा रोमहर्षक इतिहास 'वंदेमातरम्' प्रयोगातून प्रा. वसंत गिरी यांनी प्रज्वलित केला. तिसऱ्या सत्रात स्व. पुरुषोत्तम बोरकर लिखित 'मेड इन इंडिया हा' एकपात्री प्रयोग दिलीप देशपांडे यांनी सादर केला. यानंतर चंद्रशेखर पंडित यांनी 'शब्दाचे बदलते रूप' यावर भाष्य केले. चवथ्या सत्रात शालीग्राम वाडे जेष्ठ कवी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले.

बातम्या आणखी आहेत...