आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषक:बोंडअळीच्या प्रादूर्भावासाठी सप्टेंबर महिना पोषक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील विविध भागात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे केले आहे. सप्टेंबर महिना हा या किडीच्या वाढीसाठी पोषक असल्याने वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्या, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या चमूने काही भागातील कपाशी पिकांची पाहणी केली आहे. प्रारंभी अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट व बार्शीटाकळी तालुक्यात काही ठिकाणी बोंडअळीचे अवशेष मिळून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिनिंग प्रेसिंग असलेल्या भागात तसेच शेजारील शेतात जास्त प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मोताळा, बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे.

वर्धा अमरावती व यवतमाळ भागातही प्रादुर्भावाची प्रकरणे आहेत. काही ठिकाणी प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याने वेळीच सावध होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.दरम्यान, पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी वेळीच करा प्रतिबंधक उपाययोजना
ज्या ठिकाणी १५ ते २० दिवसांचे बोंड तयार झाले. ते बोंडअळीचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना हा गुलाबी बोंडअळीच्या किडीसाठी पोषक वातावरणाचा असल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करून किडीचा बंदोबस्त करता येतो. तर ऑक्टोबर महिन्यातील कापूस गुलाबी बोंडअळीमुक्त असू शकतो. - डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग.अकोला.

बातम्या आणखी आहेत...