आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:6 जुलैपासून सेवा उपलब्ध; वारकऱ्यांनी लाभ घेण्याचे एसटी महामंडळाचे आवाहन

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूर पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस उपलब्ध करून दिल्या होत्या.

दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक आणि प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. म्हणून पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे ४ हजार ७०० बस सोडण्यात येणार आहेत. त्यातील अकोल जिल्ह्यातून किती गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे याबाबत लवकरच नियोजन जाहीर केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बस स्थानकावरहीविविध सुविधा
यात्रेच्या काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोई सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

अकोल्यातूनही सेवा उपलब्ध
६ ते १४ जुलै २०२२ या कालावधीत या विशेष बस धावणार आहेत. माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ८ जुलै रोजी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अकोला आगारातून ५ जुलै पासून बस उपलब्ध होणार आहे. याशिवाय परतीच्या प्रवासासाठीही बसची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये आगार क्र. २ येथून बस उपलब्ध असतील.

बातम्या आणखी आहेत...