आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 प्रकल्पातून विसर्ग सुरू:पश्चिम विदर्भातील सात मध्यम प्रकल्प 100% भरले

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील २७ पैकी ७ मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ७ प्रकल्पात ६० ते ७० टक्के तर ७ प्रकल्पात ६० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान १५ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

पश्चिम विदर्भात २७ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे ७६५.०३ दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तुर्तास ५०५.३८ (६६.०६टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर पश्चिम विदर्भात एकुण साठवण क्षमतेच्या १९४४.९९ दलघमी (६२.५६ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी, उतावळी हे सात प्रकल्प १०० टक्के भरले अाहेत. तर सात प्रकल्पात ५० ते ६० टक्केच्या वर आणि सात प्रकल्पात ७० ते ८० टक्क्याच्या वर जलसाठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

लघु प्रकल्पात सात दिवसात २४३.४६ दलघमीने वाढ
पश्चिम विदर्भातील २७५ लघु प्रकल्पात सात दिवसात ४३.४६ दशलक्ष घनमिटरने वाढ झाली आहे. सात दिवसापूर्वी लघु प्रकल्पात ३५१.०३ दलघमी जलसाठा होता तो आता ५९४.४९ दलघमी झाला आहे.

गर्गा प्रकल्प अपवाद
पश्चिम विदर्भात मोठे, मध्यम, लघु प्रकल्प ओसंडून वाहात असताना अमरावती जिल्ह्यातील गर्गा हा मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेला आहे. या प्रकल्पात अद्याप जिवंत साठा उपलब्ध झालेला नाही.

या प्रकल्पातून विसर्ग सुरू
अमरावती : ऊर्ध्व वर्धा, अकोला : वान,यवतमाळ : बेबंळा या मोठ्या प्रकल्पा सोबतच अमरावती : शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव विसर्ग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...