आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यामध्ये गुरुवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने शुक्रवारी हवेमध्ये गारवा निर्माण झाला. कमाल आणि किमान तापमानामध्येही घट झाली. रस्ते ओलेचिंब झाले. ठिकठिकाणी रस्त्यांवर आणि रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचले. यंदाच्या मोसमात प्रथमच एवढ्या वेळ पाऊस कोसळला. यामुळे वातावणामध्ये नैवचैतन्य दिसून येत आहे.
रस्त्यावर, रिकाम्या प्लॉटमध्ये साचले पाणी
गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री नऊ वाजेनंतर रिमझिम पाऊस कोसळत होता. मध्यरात्री 12 नंतर पावसाचा वेग वाढल्याने दोन वाजतानंतर ते पहाटे पाच वाजतापर्यंत पाऊस सुरू होता. सकाळी 7 वाजतापर्यंत पाऊस सुरुच होता. रात्रभराच्या पावसामुळे सकाळी रस्त्यांवर, फ्लॅट्सचे पार्किंग आणि रिकाम्या प्लॉटवर पाणी साचले होते.
महान धरणावर प्रथमच 4 मिली मीटर पावसाची नोंद
महान धरण अकोला शहराची पिण्याच्या पाण्याची तहान भागवते. यावर्षी पावसाचे पाणी उशीरा पडत आहे. मृग नक्षत्राच्या 11 व्या दिवशी 16 जून रात्री 1.30 व 17 जूनच्या सकाळी 7 वाजता महान धरणावर पाणी मापन यंत्रातील पाणी मोजण्यात आले. दरम्यान यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच 4 मिलीमीटर पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. आज महान धरणाचा जलसाठा 1123.30 फूट, 342.18 मीटर, 25.814 दस लक्ष घन मीटर व 29. 89 टक्के एवढा आहे. धरणाचे 5 पैकी दोन व्हॉल पाण्यावरती उघडे असून उर्वरित 3 व्हॉल पाण्याखाली आहे.
पुढील काही दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाने 19 जूनपर्यंत विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढले काही दिवस पाऊस असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.