आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित:पोलिस अधीक्षकांच्या हस्ते शाहिद इक्बाल खान सन्मानित

बार्शीटाकळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘एक पोलिस, एक वृक्ष’ मोहीम राबवण्यात आली. या अभियानाची जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचून यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्याबद्दल बार्शीटाकळी येथील खालीद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शाहीद इक्बाल खान सरफराज खान, सय्यद अहेमद अकोट, राहुल्लह खान सरफराज खान यांना जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

एक पोलिस, एक वृक्ष संकल्पनेनुसार जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा, अकोट यासर्व पोलिस स्टेशनमध्ये शाहीद इक्बाल खान व सय्यद अहमद यांनी उपक्रम राबवला. याप्रसंगी सर्व पोलिस स्टेशनचे ठाणेदार व शांतता समिती सदस्यांची उपस्थिती होती. शाहीद इक्बाल खान यांनी आतापर्यंत वृक्षारोपण क्षेत्रात कार्य केले आहे. एक विद्यार्थी, एक वृक्ष, सिडबॉल, स्मशानभूमी, काब्रस्तान, सार्वजनिक ठिकाण, पार्क, शासकीय कार्यालय, खुली जमीन, गायरान येथे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले आहे. या पुरस्कारासाठी बद्दल शाहिद इक्बाल खान यांचे बार्शीटाकळीचे नगर अध्यक्ष महेफुज खान, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. बिस्मिल्लाह खान, ज्येष्ठ पत्रकार जेठा भाई पटेल, मुफीज अहेमद खान व सर्व नगरसेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...