आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती‎:शामली जंजाळ तरुण पिढीसाठी आदर्शवत;‎ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा. अभियंता पदावर नियुक्ती‎

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज संघर्ष करून‎ अनेक महिला यशाचे शिखर गाठत‎ ‎ आहेत.‎ ‎ यातीलच एक‎ ‎ नाव म्हणजे‎ ‎ शामली विनय‎ ‎ कुमार जंजाळ.‎ ‎ एका‎ सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली‎ शामली विनयकुमार जंजाळ हिने‎ जिल्हा परिषदेच्या शाळेतून‎ चौथीपर्यंत, नंतर दहावीपर्यंत‎ सावित्रीबाई फुले विद्यालयांमध्ये‎ मराठी मधून शिक्षण घेतले. बीटेक.‎ एमटेक झाल्यानंतर एमपीएससीद्वारे‎ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहायक‎ अभियंता पदावर नियुक्ती झाली.‎

अत्यंत संघर्षमय वातावरणात‎ शामलीने तिचे ध्येय गाठले आहे. हे‎ यश बहुजन समाजातील तरुण‎ पिढीसमोर आदर्शवत आहे.‎ स्वतःचे भविष्य स्वतः घडवण्याची‎ ताकद स्वतःमध्येच असते. या‎ युक्तीला प्रेरणा मानून भविष्याकडे‎ वाटचाल करणारी ती व्यक्तिमत्व‎ ठरते आहे.‎

बातम्या आणखी आहेत...